• Download App
    Sunil Tatkare. महायुतीत राष्ट्रवादीने उपद्रव वाढवला; पालकमंत्री पदाचा वाद सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री पदाला नेऊन भिडवला!!

    महायुतीत राष्ट्रवादीने उपद्रव वाढवला; पालकमंत्री पदाचा वाद सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री पदाला नेऊन भिडवला!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या मराठी माध्यमे देत असताना या दोन्ही नेत्यांनी युद्धाचा ठामपणे इन्कार केला असला, तरी महायुतीमध्ये भाजपने ओढून घेतलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उपद्रव द्यायला सुरुवात केली आहे. राज्यातल्या पालकमंत्री पदाचा वाद अजित पवारांचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन भिडवला आहे.

    सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे हिला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले आहे. मात्र रायगड जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादी पेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संख्या जास्त आहे. त्यामुळे भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदासाठी हट्ट धरलेल्या सुनील तटकरे यांनी पालकमंत्री पदाचा वाद मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन भिडवला आहे.

    आमदारांचे संख्या हाच निकष लावून पालकमंत्री पदाचा निर्णय घ्यायचा असेल, तर 2022 मध्ये आमदार शिवसेनेच्या निकषावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले का??, असा सवाल सुनील तटकरे यांनी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणले आहे. रायगडच्या पालकमंत्री बद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी सभ्यता सोडून टीका केल्याचा दावा तटकरे यांनी करून शिवसेनेला अंगावर घेतले आहे.

    आमदारांच्या संख्या बळावर आधारित मुख्यमंत्री पदाचा वाद काढला, तर आपण भाजपच्या गुडबुक्समध्ये राहू, असा सुनील तटकरेंचा होरा दिसतो आहे‌. पण एकनाथ शिंदे यांचे मंत्री आणि आमदार देखील रायगडच्या पालकमंत्री पदाचा दावा सहज सोडण्याची शक्यता नाही.

    Ajit Pawar has been promoted to the post of Chief Minister by NCP state president Sunil Tatkare.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!