• Download App
    अजित पवारांनी असा बळकावला जरंडेश्वर , बँकेत आठ कोटी असताना तीन कोटी वसुलीसाठी विकला कारखाना, त्यासाठी विकला ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांचा आरोप|Ajit Pawar grabbed Jarandeshwar, sold the factory for recovery of Rs 3 crore while the bank had Rs 8 crore, senior leader Shalinitai Patil alleged.

    अजित पवारांनी असा बळकावला जरंडेश्वर , बँकेत आठ कोटी असताना तीन कोटी वसुलीसाठी विकला कारखाना, त्यासाठी विकला ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांनी कसा बळकावला याची कहाणी ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांनी सांगितली आहे. केवळ तीन कोटी रुपयांचा हप्ता थकला म्हणून कारखाना विकण्यात आला. विशेष म्हणजे त्यावेळी कारखान्याच्या खात्यात 8 कोटी रुपये होते. पण बँकेतही तेच आणि विकत घेणारेही तेच.सत्तेचा दुरुपयोग करून पवारांनी कारखाना बळकवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.Ajit Pawar grabbed Jarandeshwar, sold the factory for recovery of Rs 3 crore while the bank had Rs 8 crore, senior leader Shalinitai Patil alleged.

    माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असलेल्या शालिनीताई पाटील यांनी सांगितले की आमच्या कारखान्याचा कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी थोडा उशीर झाला होता. केवळ तीन कोटींचा हफ्ता शिल्लक असताना त्यांनी कारखाना विकला. आमच्या कारखान्याचं त्यांच्याकडे जे अकाऊंट आहे



    त्या खात्यात ८ कोटी ३४ लाख जमा होते. ते पैसे वळवण्यास सांगितलं असता दुर्लक्ष करण्यात आलं. सरकारची आमच्या कर्जाला हमी होती. त्यामुळे सरकारकडे जाता आलं असतं. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. विचारणारं कोणी नव्हतं. त्यांनी सत्तेचा पुरेपूर गैरफायदा केला आणि २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार अजित पवारांच्या काळात झाला.

    सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

    जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून कारखाना बळकावल्याचा आरोप केला आहे.

    शालिनीताई म्हणाल्या,थोडा उशीर झाला पण आता ईडीने कारवाई केली असून आम्हाला न्याय मिळाला आहे. वास्तविक २०१९ मध्ये अण्णा हजारे, माणिकराव जाधव, अरोरा आणि मी अशा चार जणांनी अर्ज केला होता. अरोरा यांनी नंतर माघार घेतली. २०१९ मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता.

    त्यावेळी ईडीने एफआयआर दाखल करुन घेतला होता. पण काहीच कारवाई न झाल्याने दुसरा अर्ज करण्यात आला. त्याला ईडीने आम्हाला पाठिंबा दिला. भ्रष्टाचार झाला असल्याचं त्यांनी मान्य केलं. २७ हजार सभासदांना न्याय मिळाला आहे.

    Ajit Pawar grabbed Jarandeshwar, sold the factory for recovery of Rs 3 crore while the bank had Rs 8 crore, senior leader Shalinitai Patil alleged.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक