विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजप मध्ये आले असले आणि अजित पवार त्याच भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले असले तरी पवार आपले चव्हाण घराण्याशी असलेले राजकीय वैर विसलेले नाहीत. म्हणूनच अजित पवारांनी अशोक चव्हाणांच्या नांदेड जिल्ह्यात जाऊन त्यांना डिवचले. Ajit Pawar
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याच्या निमित्तानं विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, अनेक माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उपस्थितांना संबोधित करताना पक्षाची विचारधारा समजावून सांगितली. Ajit Pawar
देगलूरची भूमी ही मराठवाड्याची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. या भूमीत हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा ही सातत्यानं जपली गेलेली आहे. शिव-शाह-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या बळावर आम्ही सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही बेरजेचं राजकारण करतोय. समाजा-समाजात, धर्म-प्रांतात द्वेष बाळगून आपण पुढे जाऊ शकत नाही, विकास होऊ शकत नाही. याउलट जातीय सलोखा ठेवणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. देगलूरकरांनी नेहमीच या विचारांना जपलेलं आहे.
आगामी काळात जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी कसून कामाला लागलं पाहिजे. अतिवृष्टीमुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याला पुन्हा उभं करण्यासाठी आपल्या सरकारनं ३२ हजार कोटींची आर्थिक मदत देऊ केली आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं जी निवेदनं माझ्यापर्यंत पोहोचली आहेत, त्यांची दखल घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन कामं मार्गी लावली जातील. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत, त्यामुळे निश्चिंत रहा, असा विश्वास यावेळी दिला.
अशोक चव्हाण + भाजप शिकवणार धडा
मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा पद्धतीनं सगळीकडे विकास पोहोचवून संपूर्ण महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. विकासासाठी निधी कुठे कमी पडू देणार नाही, अशी खात्री दिली. पण हे सगळे करताना अजित पवारांनी अशोक चव्हाणांना डिवचले आणि भाजपशी वैर घेतलेय. आता अशोक चव्हाण आणि भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीला कसा धडा शिकवतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ajit Pawar eyes on Ashok Chavan’s district
महत्वाच्या बातम्या
- Bangladeshi : बांगलादेशी घुसखोरांवर एसआयआरची कुऱ्हाड, देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांचे सघन पुनरीक्षण
- UPI : 6 महिन्यांत ₹1572 लाख कोटींचे व्यवहार, 9% UPI मधून; ऑक्टोबरमध्ये रोज ₹96 हजार कोटींहून अधिक व्यवहार
- Afghanistan ; पाकला पाणी देण्यास अफगाणिस्तानचा नकार; कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
- शिंदेंची मोदी भेट बिहार निवडणुकीसाठी की महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना “इशारा” देण्यासाठी??