नाशिक : बारामतीतल्या विमान अपघातात घडलेल्या अजित पवारांच्या अकाली exit नंतर महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड shock wave आली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची चर्चा सुप्त आवाजात सुरू झाली. कारण अजित पवार यांच्यासारखा पक्षावर प्रशासनावर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर जबरदस्त पकड असणारा नेता अचानक नाहीसा झाल्यानंतर त्यांची जागा नेमकी कोण भरून काढणार??, हा सवाल सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आला. Ajit Pawar exit
– पवारांच्या छायेखालून बाहेर येऊन अजितदादांची वाटचाल
अजित पवारांची महाराष्ट्रातल्या प्रशासनावर प्रचंड पकड होती. ते सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाची नस अन् नस त्यांना माहिती होती. शरद पवारांच्या छत्रछायेखाली राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले असले, तरी त्यानंतर मात्र त्यांनी स्वतंत्रपणे दमदार वाटचालीला सुरुवात केली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातल्या राजकीय कर्तृत्वाच्या भेदांची चर्चा सुद्धा महाराष्ट्रभर झाली. सुप्रिया सुळे या चार टर्म खासदार राहिला तरी त्या शरद पवारांच्या छत्रछायाकडून बाहेर येऊ शकल्या नाहीत. त्या उलट अजित पवारांनी पवारांच्या छत्रछाये खालून बाहेर येऊन स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने खेळवले. तसे तीन दशके महाराष्ट्राच्या राजकारणात राहूनही सुप्रिया सुळे करू शकल्या नाहीत.
– सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाच्या मर्यादा
त्यामुळे अजित पवारांच्या exit नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाळ नेमका कोण करणार यामध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर असले तरी त्यांची मर्यादित राजकीय क्षमता आणि स्वतंत्रपणे नेतृत्व करून संपूर्ण पक्ष पुढे नेण्याची शक्यता, याविषयी अनेकांनी शंका उपस्थित केल्या.
– सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाचा उदय शक्य
या पार्श्वभूमीवर ज्या महत्त्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाले त्या सुप्रिया सुळे यांच्याकडे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व जाईल की सुनेत्रा पवारांचे नेतृत्व पक्षांमध्ये पुढे आणले जाईल??, हा गंभीर सवाल चर्चेला आला. बारामती लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत शरद पवारांनी “घरची मूळची पवार” आणि “बाहेरून आलेली पवार” असा भेद करून सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात आपले वजन टाकले होते पण शरद पवारांसारखा पुरोगामी नेता सुद्धा सुनेत्रा पवारांना आपल्या घरातली पवार मानायला तयार नसल्याचे चित्र त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते.
– प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची भूमिका महत्त्वाची
पवारांच्या घरातले सगळे political management जरी एकमेकांशी संवाद ठेवून होत असले, तरी त्याच्यात गंभीर मतभेद आहेत आणि ते मतभेद अनेकदा टोकाचे होतात, हे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या रूपाने अनेकदा समोर आले. अशावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व मनापासून स्वीकारतील का, की राष्ट्रवादीतले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे दुसऱ्या फळीतले नेते सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व पुढे करतील??, असा गंभीर सवाल या निमित्ताने समोर आला. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यापेक्षा सुनेत्रा पवारांच्या नवोदित नेतृत्वाखाली काम करणे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना कितीतरी सोपे जाऊ शकते.
अजित पवारांच्या अकाली exit पूर्वी दोन राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू होती. जिल्हा परिषद निवडणुका नंतर दोन्ही राष्ट्रवादी एक करण्यासंदर्भातला निर्णय अजित पवार घेणार होते. त्या बदल्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार होते, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात होतीच. परंतु ही चर्चा फेटाळून लावण्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आघाडीवर होते. कारण दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणानंतर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असे म्हटल्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना आपले राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचा सिग्नल मिळाला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार नाहीत, असे मुलाखतींमधून स्पष्ट केले होते.
– भाजपचे केंद्रीय नेते निर्णय घेतील
अशा स्थितीत अजित पवारांच्या exit नंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे नेते सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व स्वीकारण्यापेक्षा सुनेत्रा पवारांचे नेतृत्व तयार करण्याच्या कामी लागल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही असण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा सुनेत्रा पवारांचे नेतृत्व तयार करताना आपण त्यांच्या बरोबरीचे स्थान मिळवता येईल आणि भाजप सारखा पक्ष सुद्धा त्यांना ही गोष्ट करण्यात साथ देण्याची दाट शक्यता आहे. कारण अजित पवारांसारखी प्रशासनावर पकड असणारा नेता आता राष्ट्रवादीत उरलेला नाही. शरद पवार केवळ वयामुळे पूर्वीच्या तडफेने उभे राहून काम करण्याची शक्यता नाही. सुप्रिया सुळे या चार टर्म खासदार असल्या तरी त्यांचे नेतृत्व संपूर्ण पक्ष पुढे नेण्याइतपत सक्षम असण्याविषयी दाट शंका आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीची विशिष्ट मर्यादेची ताकद लक्षात घेऊन भाजप सारखा पक्ष सुनेत्रा पवारांच्या नवोदित नेतृत्वाच्या मागे उभा राहिल्यास ते राजकारणाच्या दृष्टीने सोयीचे आणि सुसंगत ठरू शकते.
Ajit Pawar exit: In the Nationalist Congress Party, the leadership of Sunetra Pawar will develop, excluding Supriya Sule.
महत्वाच्या बातम्या
- CM MK Stalin : स्टालिन म्हणाले- तमिळनाडूमध्ये हिंदीसाठी जागा नाही; भाषा लादण्याचा नेहमीच विरोध करू
- 77 व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची प्रगती आणि आर्थिक आत्मनिर्भरतेचा जयघोष; उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर!!
- उपासना धर्मापुरता मर्यादित राहिलेल्या समाजाला राष्ट्रधर्माची गरज; भैय्याजी जोशींचे प्रतिपादन
- संविधानाचा जागर ते दुष्काळ आता भूतकाळ; प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत चित्ररथांची झलक!!, पाहा फोटो फीचर