विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुटू फुटू बिखरून जाऊ, पण घराणेशाहीच्या सत्तेसाठी एकत्र येऊ!!, असेच अजितदादांच्या मुलाखतीमधून समोर आले. तुम्ही आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का??, असा सवाल एबीपी माझाच्या कार्यक्रमात अजितदादांना केल्यावर मी काही ज्योतिषी नाही, पण राजकारणात काहीही होऊ शकते, असे सूचक उद्गार त्यांनी काढले आणि त्यातून त्यांनी महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या राजकारणाची चुणूक दाखवली.
बाकी अजितदादांनी शरद पवारांनी केलेल्या नकलेबद्दल नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत फक्त राज ठाकरेच नक्कल करायचे. आता पवार साहेबांसारखा मोठा नेता नक्कल करू लागला, पण त्यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्याला माझ्यासारख्या मुलाच्या वयाच्या नेत्याची नक्कल करणे शोभत नाही, असा टोला त्यांनी पवारांना हाणला. मुलीचा वाढदिवस होता, तर कोर्टात जायचेच कशाला वकील कशाला नेमलेत, अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांना झापले. नवाब मलिकांना दिलेल्या उमेदवारीचे त्यांनी समर्थन केले.
पण एवढे सगळे झाल्यानंतर देखील शरद पवार आणि तुम्ही पुन्हा एकत्र येणार का??, या सवालावर बोलताना अजितदादांनी राजकारणात काहीही होऊ शकते, असे सूचक उद्गार काढले. तुम्हाला कधी वाटले होते का, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, पण महाराष्ट्रात त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. तसे सरकार चालले ना!!, मग भविष्यात देखील राजकारणात काहीही होऊ शकते, असे अजितदादा म्हणाले.
अजितदादांच्या या सूचक उद्गारांमधूनच तुटू फुटू बिखरून जाऊ, पण घराणेशाहीच्या सत्तेसाठी पुन्हा एकत्र येऊ!!, हेच महाराष्ट्राच्या राजकारणातले भविष्य उघड झाले.
Ajit Pawar dynasty will again come together for power
महत्वाच्या बातम्या
- Dilip Sananda सानंदांचा पुन्हा ईव्हीएमवर विश्वास कसा बसला हाच खामगाव मतदारसंघात सवाल
- Election Commission निवडणूक आयोगाने EVMबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले ; प्रत्येक आक्षेपाला उत्तरे दिली
- Ram Temple : 500 वर्षांनंतर प्रथमच रामलल्ला अयोध्येतील मंदिरात दिवाळी साजरी करणार – पंतप्रधान मोदी
- Irrigation scam सिंचन घोटाळ्याचा विषय स्वतःहून काढून अजितदादांनी दिली संधी; पृथ्वीराज बाबांनी केली कुरघोडी!!