नाशिक : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा आली, पण पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात तीच नैतिकता त्यांनी खुंटीला टांगून ठेवली.Ajit Pawar double standard in manikrao kokate and parth Pawar’s corruption
नाशिक मधले मुख्यमंत्री कोट्यातून चार फ्लॅट लाटल्ययाप्रकरणी माणिकराव कोकाटेंना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना ५०००० दंड ठोठावला. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले. पोलिसांनी त्या अटक वॉरंट वर कायदेशीर कार्यवाही सुरू केली. त्यामुळे भाजपने माणिकरावांवर दबाव वाढविला. या राजकीय दबावातून त्यांना राजीनामा देणे भाग पडले. तो राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला. तो राजीनामा अजितदादांनी स्वतःकडे ठेवून घेतला होता.
पण याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खाते आणि बाकीची खाती काढून घेतली. त्यांना बिन खात्याचे मंत्री ठेवले होते.
पण आज अजित पवारांनी संविधानिक नैतिकतेचा हवाला देत माणिकरावांचा राजकारण स्वीकारून तो मुख्यमंत्र्यांकडे पुढच्या कारवाईसाठी पाठविला. तो पाठविता अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानिक नैतिक भूमिकेची भलामण केली. त्यांनी या संदर्भात सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी बाकीच्या “उच्च” गोष्टी सुद्धा लिहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सार्वजनिक जीवनात संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि पालिकेचा सन्मान करतो, असा दावा केला. माणिकरावांचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांनी फारच नैतिक उच्च भूमिका घेतली.
– पार्थ पवार जमीन घोटाळ्यात नैतिकता विसरले
पण पुण्यातल्या पार्थ पवारच्या मुंढवा जमीन घोटाळ्यात ही नैतिकता मात्र अजित पवार विसरले. पार्थ पवार विरोधात अनेक पुरावे समोर येऊन सुद्धा गुन्हा दाखल होऊ दिला नाही. पार्थ पवारच्या भोवतालचे शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना जमीन घोटाळ्यात अडकवले. बाकीचे अधिकारी सुद्धा अडकवले. महसूल खात्यातल्या अधिकाऱ्यांवरच मुंढव्याच्या जमीन घोटाळ्याची जबाबदारी ढकलली. पण १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारवर मात्र अद्याप आंच येऊ दिली नाही. यावेळी अजितदादांना कुठलीही संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेचा सन्मान अशा गोष्टी दिसल्या नाहीत. त्यावर त्यांनी कुठलेही भाष्य केले नाही. त्यामुळे अजित पवारांच्या या दुटप्पी राजकीय व्यवहारावर सोशल मीडियातून जोरदार टीका झाली. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा अजितदादांच्या दुटप्पी भूमिकेवर नेमकेपणाने बोट ठेवले. अजितदादांनी माणिकराव कोकाटे यांचा राजकीय बळी दिला, पण स्वतःच्या मुलाला वाजवायचा डाव खेळल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Ajit Pawar double standard in manikrao kokate and parth Pawar’s corruption
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेत AI चा वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना
- Nirav Modi : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला थांबवण्यासाठी नवीन अपील; 6,498 कोटींच्या PNB घोटाळ्यात भारतात येऊ इच्छित नाही
- राष्ट्रवादीतली घोटाळखोरी; सगळे “पवार संस्कारित” अमित शाहांच्या दारी
- Chidambaram : चिदंबरम म्हणाले- बिलांचे हिंदी शब्द गैर-हिंदी भाषिकांचा अपमान; 75 वर्षांच्या परंपरेमुळे कोणालाही अडचण झाली नाही, मग आता बदल का?