Wednesday, 7 May 2025
  • Download App
    पवारांविषयी भुजबळ काय बोलले हे मी ऐकलेच नाही; अजित पवारांचे कानावर हात Ajit pawar distances himself from chagan bhujbal criticism of sharad pawar

    पवारांविषयी भुजबळ काय बोलले हे मी ऐकलेच नाही; अजित पवारांचे कानावर हात

    प्रतिनिधी

    पुणे : बीडच्या कालच्या सभेत छगन भुजबळ यांनी जुने तेलगी प्रकरण काढून शरद पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले. त्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये जुंपली असताना अजित पवारांनी मात्र कानावर हात ठेवले. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी छगन भुजबळ हे शरद पवारांविषयी नेमके काय बोलले हे ऐकलेच नसल्याचा दावा केला, तसेच विवेक बुद्धीला पटल्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने गेलो, असा खुलासा केला Ajit pawar distances himself from chagan bhujbal criticism of sharad pawar

    माझ्या सद्सदविवेक बुद्धीला सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पटतात. यामुळेच मी भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

    अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा 24 तास कार्यरत असणारा दुसरा कोणताही राष्ट्रीय नेता सध्या दिसत नाही. विकासाच्या महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यातूनच त्यांनी अर्थव्यवस्था बळकट करणे, रस्त्यांचे जाळे उभारणे, रेल्वे – मेट्रोची कामे जलदगतीने करणे आदी ठोस निर्णय त्यांनी घेतलेत. यामुळे देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी मी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. अलीकडच्या काळात माझ्या सद्सदविवेक बुद्धीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पटत आहेत. बारामती आणि बीडमध्ये मला ‘ न भूतो ,न भविष्य ‘अशा प्रकारे जनतेचा प्रतिसाद मिळाला आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला.

    छगन भुजबळ काय बोलले मी ऐकले नाही

    यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांनी बीडमधील सभेत शरद पवाराविषयी केलेले वादग्रस्त विधान आपल्याला ऐकू आले नसल्याचेही स्पष्ट केले. अजित पवार म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांनी बीड येथील सभेत शरद पवार यांच्याविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य मला ठळकपणे ऐकू आले नाही. पण त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ही गोष्ट समजली. या प्रकरणी माझे भुजबळ यांच्याशी बोलमे झाले नाही.

    राजकारणात वेगवेगळे मत प्रवाह असले तरी, आपल्या राज्याची राजकारण करण्याची व कामाची पद्धत वेगळी आहे. सध्या अनेक राजकारणी जगभरातील सर्व प्राण्यांच्या नावाचा वापर करून उपरोधिक टीका करतात. त्यांनी ते शब्द जपून वापरावेत. सर्व पक्षातील नेत्यांनी अशाप्रकारे एकमेकांवरील टीका थांबवली पाहिजे, असे ते म्हणाले.

    कृत्रिम पाऊस तात्पुरता उपाय

    कृत्रिम पाऊस हा तात्पुरत्या उपाययोजनेचा भाग आहे. त्याने कोणतीही परिस्थिती बदलत नाही. दुबईत वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात आहे. मला त्याची कल्पना नाही. या प्रकरणी संपूर्ण निकाल देईल असे तंत्रज्ञान मिळाल्यास सरकार त्यावर सकारात्मक विचार करेल.

    Ajit pawar distances himself from chagan bhujbal criticism of sharad pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस