विशेष प्रतिनिधी
पुणे : अजितदादांच्या गैरहजेरीत गोविंद बागेतली दिवाळी; पण अर्धा ग्लास रिकामा नसल्याची सुप्रिया सुळेंची मखलाशी!!, असे चित्र आज बारामती दिसले शरद पवारांचे निवासस्थान गोविंद बागेतली दिवाळी नेहमीच गाजते, पण यावेळी अजितदादा अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना-भाजपच्या सरकारच्या वळचणीला घेऊन गेले. त्यामुळे गोविंद बागेतली दिवाळी फिक्की झाली. अजित पवार आणि आमदार रोहित पवार सोडून बाकी सगळे पवार कुटुंबीय गोविंद बागेत हजर होते. Ajit pawar didn’t attend diwali festival in govind baugh in baramati, shows divide in pawar family
दिवाळीच्या पाडव्यानिमित्त अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवारांना भेटायला येणार अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. पण त्याचवेळी बारामतीतल्या धनगर आरक्षण आंदोलकांनी उचल खाल्ली आणि त्यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी शरद पवारांना भेटायला येणाऱ्या नेत्यांना आणि आमदारांना अडविण्याचा इशारा दिला. हा इशारा दिल्यामुळे सुप्रिया सुळे तब्बल पाच दिवसांनी काल आंदोलकांना भेटायला आंदोलन स्थळी गेल्या. गोविंद बागेतल्या दिवाळीच्या बातमीपेक्षा धनगर आरक्षणाची आंदोलकांची बातमी मोठी झाली असती या शक्यतेने सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली. पण माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार आहे का??, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केला. त्यावेळी आंदोलक संतप्त झाले होते. परंतु सुप्रिया सुळे यांनी त्यांना “कन्व्हिन्स” केले. पण आज अजितनिष्ठ आमदार गोविंद बागेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे त्या आमदारांना धनगर आरक्षण आंदोलकांनी अडवायचा प्रश्नच उद्भवला नाही.
रोहित पवार संघर्ष यात्रेच्या निमित्ताने बीडला आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांबरोबर दिवाळी साजरी करत आहेत, पण एकीकडे अजितदादांची गोविंद बागेतली अनुपस्थिती आणि दुसरीकडे धनगर आरक्षण आंदोलनाचा दबाव यामध्ये बारामतीतल्या गोविंद बागेतली दिवाळी साजरी झाली. बारामतीतल्या नागरिकांनी गोविंद बागेत येऊन शरद पवारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना गाठले आणि त्यांना अजितदादांच्या गैरहजेरी विषयी प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना डेंगी झाला होता. त्यामुळे ते गेले 20 – 25 दिवस कुठल्याच कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत असे सांगितले. रोहित पवार संघर्ष यात्रेत आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारांच्या महागाईच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी रोहित पवार संघर्ष करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या. पण त्याचवेळी आता अजित पवार गोविंद बागेत नाहीत हे वास्तव मोठ्या मनाने स्वीकारले पाहिजे. अर्धा ग्लास रिकामा नाही. तो भरलेला आहे, असे म्हटले पाहिजे, असे उद्गार सुप्रिया सुळे यांनी काढले.
पण अजितदादा अमित शाहांना भेटले होते ना
पण जे अजितदादा डेंगी झाल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत, तेच अजितदादा शरद पवारांना प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी पुण्यात भेटले. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील भेटून आले. याबद्दल मात्र बारामतीतल्या कोणा पत्रकाराने सुप्रिया सुळे यांना गोविंद बागेत प्रश्न विचारला नाही. त्यामुळे त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देखील दिले नाही. पण अजितदादांच्या अनुपस्थितीत झालेली गोविंद बागेतली दिवाळी आणि सुप्रिया सुळे यांनी अर्धा ग्लास रिकामा नसल्याची केलेली मखलाशी यातून
गोविंद बागेतल्या दिवाळीतले राजकीय वास्तव समोर आले.