• Download App
    अर्थसंकल्पाच्या बैठकीला अजित पवार फिरकलेही नाहीत, डॉ. भागवत कराड यांचा आरोप|Ajit Pawar did not even turn up for the budget meeting, Dr. Allegation of Bhagwat Karad

    अर्थसंकल्पाच्या बैठकीला अजित पवार फिरकलेही नाहीत, डॉ. भागवत कराड यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: अर्थसंकल्पाची तयारी सुरु असतानाच्या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री असलेले अजित पवार फिरकलेच नाहीत. केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू असताना घेण्यात येत असलेल्या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार फिरकलेच नाहीत. यांना बजेटचे काही पडलेले नव्हते, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले आहे.Ajit Pawar did not even turn up for the budget meeting, Dr. Allegation of Bhagwat Karad

    उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना निधीवाटपातल्या अन्यायाचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात स्पष्टपणे दिसत आहे. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले, ते शोधूनही सापडत नाही, अशी टीका केली होती. यावर बोलताना डॉ. कराड म्हणाले, बजेट प्रिपरेशनसाठी दोन वेळा बैठक झालीबजेट प्रिपरेशनसाठी दोन वेळा बैठक झाली.



    अजित पवार येऊ शकले नाहीत. राज्यमंत्री देखील आले नाहीत. त्यांना बजेटमध्ये काय रस होता. तर केवळ मेल पाठवला आणि नंतर केवळ एक अधिकारी पाठवला. त्यांनी बजेटमध्ये कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जबाबदारी पाळली की नाही, याबाबतही त्यांना विचारा.

    हा देशाचा अर्थसंकल्प आहे. रेल्वे, ट्रान्सपोर्ट, शिक्षण या सगळ्यासाठी राज्याला निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्रालाही खूप मोठा हिस्सा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे समजून घ्यायचे नाही. अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सर्वच ठिकाणी आहे. अजित पवारांनी बजेट थोडे बघण्याची गरज आहे.

    तसेच महाराष्ट्राचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही. आम्ही दिल्लीत आठ मंत्री बसलो आहोत, असे आश्वासन देत, मागच्या वषार्पेक्षा अडीच लाख कोटींनी बजेट वाढले आहे, असेही कराड यांनी स्सांगितले.
    हा अर्थसंकल्प पुढच्या २५ वर्षांच्या विकासाची ब्ल्यूप्रिन्ट असल्याचा दावा निरर्थक असून

    निवडणूका असलेल्या पाच राज्यांमधल्या जनतेची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. संरक्षणक्षेत्राला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या आठ वर्षात या दिशेने केंद्र सरकारनं काय केलं याच उत्तर आता तरी द्यावे, असे पवार म्हणाले होते.

    Ajit Pawar did not even turn up for the budget meeting, Dr. Allegation of Bhagwat Karad

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस