विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यात उभय नेत्यांत संभाव्य आघाडीविषयी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.Ajit Pawar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आता काँग्रेसपुढे मैत्रिचा हात पुढे करून भाजपशी दोनहात करण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे.Ajit Pawar
अजित पवारांचा सतेज पाटलांना फोन
एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अजित पवार यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन केला आहे. त्यात दोन्ही नेत्यांत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांची युती झाली तर या दोन्ही महापालिकांतील राजकीय समीकरण बदलून भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार व सतेज पाटलांतील चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
भाजपचा विजयी वारू रोखण्याचा प्रयत्न
उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे भाजप आगामी काळात शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत सोबत ठेवेल याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. हाच धोका ओळखून अजित पवारांनी काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस जुने मित्र आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपचा विजयी वारू रोखता येईल, असे अजित पवारांनी सतेज पाटील यांना सांगितल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, अजित पवारांनी पुण्यात शरद पवाराला सोबत घेण्याचीही चाचपणी सुरू केली आहे. त्यातच आता त्यांना आपला जुना मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसची साथ मिळाली तर या तिन्ही पक्षांची ताकद भाजपसाठी अडचणीची ठरू शकते.
राष्ट्रवादी महायुतीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला समाधानकारक यश मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपचे राज्यभरात 117 नगराध्यक्ष निवडून आले. तर शिंदे गटाचे 53, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 37 नगराध्यक्ष निवडून आले. अजित पवारांकडे राज्याचे अर्थखाते आहे. त्यामुळे तेच शहरी नगरपालिकांमध्ये विविध योजनांसाठी पैसे उपलब्ध करून देऊ शकतात असा संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. पण त्यानंतरही राष्ट्रवादीला महायुतीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
Ajit Pawar Congress Alliance Pune Elections Satej Patil Call Photos VIDEOS Report
महत्वाच्या बातम्या
- Udayanidhi : उदयनिधी म्हणाले- तामिळनाडूवर हिंदी लादण्याची परवानगी मिळणार नाही; केंद्रावर आरोप
- नगरपालिकांच्या विजयानंतर एकनाथ शिंदे लागले पुढच्या कामाला; महाविकास आघाडीचे नेते पत्रकार परिषदांमध्ये मग्न!!
- अजितदादा + भुजबळांच्या राष्ट्रवादीची नाशिक मध्ये फरफट; भाजपने महायुतीत घ्यावे म्हणून नेत्यांची धडपड!!
- Zelenskyy : झेलेन्स्की म्हणाले- अमेरिका व रशियासोबत त्रिपक्षीय चर्चेसाठी तयार; पण जमीन सोडणार नाही