अजित पवारांना कोणतीही नवीन जबाबदारी न मिळल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण नियुक्त्यांचीही घोषणा केली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अजित पवारांवर कोणतीच नवीन जबाबदारी सोपवली गेली नाही. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर या बैठकीनंतर अजित पवारही तातडीने निघून गेल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात आता अजित पवारांनी ट्वीटद्वारे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. Ajit Pawar congratulated the newly elected office bearers of NCP
अजित पवार म्हणातात, ‘’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रियात सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!’’
याचबरोबर ‘’शरद पवारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. शरद पवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!’’ असं अजित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातल्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्लीत जाऊन “कात्रजचा घाट” दाखवत शरद पवारांनी राष्ट्रवादीतील भाकरी फिरवत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. पण त्यावेळी अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी सोपवल्याची घोषणा केली नाही. हे एक प्रकारे अजितदादांचे “राजकीय कुपोषण” घडविण्याचा प्रकार आहे. त्यांना त्यांच्या कपॅसिटीनुसार कोणतेच पद न देणे हे अजितदादांचे राजकीय कुपोषणच आहे!!
मात्र, यानंतर अजित पवारांचाच हा मूळ प्रस्ताव होता, त्याचबरोबर अजित पवार कोणतेही प्रतिक्रिया न देता कार्यक्रमातून निघून गेले, अशा बातम्या आल्या. पण या सर्व राजकीय प्रक्रियेत अजितदादांचा “राजकीय ऑप्शन” शरद पवारांनी खुला करून दिला आहे, हे मात्र कोणाच्या लक्षात आलेले दिसत नाही.
Ajit Pawar congratulated the newly elected office bearers of NCP
महत्वाच्या बातम्या
- धुळ्यातील टिपू सुलतानच्या बेकायदेशीर स्मारकावर बुलडोझर, AIMIM आमदाराने उभारले होते, हिंदू संघटनांच्या तक्रारीनंतर कारवाई
- नवीन ‘’डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल’’ लवकरच संसदेत सादर केले जाणार – राजीव चंद्रशेखर
- WATCH : ‘गोडसेही भारताचे सुपुत्र, औरंगजेब आणि बाबरसारखे आक्रमक नव्हते’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे वक्तव्य
- क्रिकेट चाहत्यांचा फायदा, जियोनंतर आता हॉटस्टार मोफत दाखवणार ICC क्रिकेट वर्ल्डकप, OTT स्पर्धेचा परिणाम