विशेष प्रतिनिधी
बारामती : Ajit Pawar विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एका सभेत बोलताना अजित पवारांनी एक विधान केले होते. अजित पवार म्हणाले होते, काहींना वाटते की मी साहेबांना सोडायला नको होते. पण मी साहेबांना सोडलेले नाही, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
अजित पवार म्हणाले, तुम्हाला काहींना वाटत असेल की साहेबांना सोडायला नको होते. मित्रांनो मी साहेबांना सोडलेले नाही. मी साहेबांना सांगत होतो की सर्व आमदारांचे मत होते. माझ्या एकट्याचे मत नव्हते. सर्व आमदारांच्या सह्या आहेत. सर्वांचे मत होते की सरकारमध्ये जावे. आता सरकारमध्ये का जायचे? तर कामाला स्थगिती आली होती. आज या ठिकाणी बसलेल्यांपैकी संभाजी आणि राजवर्धन यांना विचारा. आपण मंजूर केलेल्या कामांना स्थगिती आली होती. तेव्हा म्हंटले हे तर तापच झाला. लोक मला तर वेड्यात काढतील कारण पैसे पाठवले आणि स्थगिती दिली. आता ती स्थगिती मी नव्हती दिली. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. स्थगिती सरकारने दिली होती, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये एकाच कुटुंबातील दोन उमेदवार निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे ही लढाई पवार कुटुंबियांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे.
युगेंद्र पवार यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील प्रचार सभा सुरू आहेत. बारामतीमधून कोण निवडून येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. युगेंद्र पवार यांना शरद पवारांचा पाठिंबा असल्याने याचा फायदा त्यांना निवडणुकीत होणार का? तसेच बारामतीमध्ये अजित पवारांचे वर्चस्व असल्याने पुन्हा एकदा त्यांनाच आमदारकी मिळणार असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. आता काही दिवसांतच याचा निकाल म्हणजे 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, त्याची उत्सुकता सर्वांना असल्याचे दिसून येत आहे.
Ajit Pawar big statement on the eve of elections
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा, मनोज जरांगे यांचे छगन भुजबळांच्या येवल्यात आवाहन
- Rajnath Singh संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- Rahul & priyanka Gandhi भावा – बहिणीच्या भाषणांची प्रादेशिक स्क्रिप्ट; ठाकरे + पवारांमागे काँग्रेसची फरफट!!
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई चकमकीत पाच जण ठार