• Download App
    Vijay Ghadge Ajit Pawar Assures Action: Kokate, Suraj Chavan

    Vijay Ghadge : अजित दादांचा घाडगेंना शब्द: माणिकराव कोकाटेंवर मंगळवारपर्यंत कारवाई होणार

    Vijay Ghadge

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Vijay Ghadge अ खिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कवाडे बंद केली आहेत. अजित पवार यांनी स्वतः आपल्याला हा शब्द दिल्याचा दावा विजय घाडगे यांना केला आहे. सोबतच विधिमंडळात रमी खेळण्याचा आरोप झालेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही मंगळवारपर्यंत योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिल्याचे घाडगे म्हणाले. Vijay Ghadge

    युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी लातूर येथे विजय घाडगे यांना मारहाण केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापुढे ही घटना घडली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. या घटनाक्रमानंतर विजय घाडगे यांनी आज पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना घाडगे यांनी पवारांनी आपल्याला सूरज चव्हाणला पुन्हा पक्षात घेणार नसल्याची ग्वाही दिल्याचे सांगितले. Vijay Ghadge



    काय म्हणाले विजय घाडगे?

    विजय घाडगे म्हणाले, आमचे काय चुकले होते, याची विचारणा करायला आम्ही अजित पवारांकडे गेलो होतो. अजित पवारांनी सांगितले की जे काही झाले ते चुकीचे झाले आणि सूरजचव्हाण यांचा राजीनामा देखील घेतला असून त्याला पुन्हा पक्षात घेतले जाणार नसल्याचा शब्द अजित पवारांनी दिला.

    तसेच आम्ही लातूरच्या पोलिस ठाण्यात जी काही तक्रार दाखल केली होती, त्यावर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. याविषयी देखील आम्ही अजित पवारांना माहिती दिली. अजित पवारांनी लातूरच्या एसपींना फोन लाऊन सांगितले की जे काही म्हणणे आहे ते जबाबात घ्या. त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. व्हिडिओमध्ये सगळे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्याची माहिती विजय घाडगे यांनी दिली.

    ज्या कारणामुळे हा प्रकार घडला होता, तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रम्मी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूरमध्ये असताना विजय घाडगे यांनी त्यांच्या समोर संताप व्यक्त करत निवेदन दिले होते. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. हीच मागणी विजय घाडगे यांनी आज अजित पवारांकडे केली. त्यावर अजित पवारांनी मंगळवार पर्यंतचा वेळ मागितला असल्याची माहिती घाडगे यांनी दिली आहे.

    माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही घेतला तर आंदोलन करणार – विजय घाडगे

    अजित पवारांनी विजय घाडगे यांना सांगितले की मंगळवारी कोकाटे यांना बोलावले आहे. आमची अजून भेट झालेली नाही. मंगळवारी कोकाटे मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब बसणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर मिळणार आहे. तसेच मी शब्दाचा पक्का आहे, असेही अजित पवारांनी सांगितल्याचे घाडगे यांनी सांगितले आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर अजित पवारांच्या विरोधात शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा घाडगे यांनी दिला आहे.

    Vijay Ghadge Ajit Pawar Assures Action: Kokate, Suraj Chavan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    गणेशोत्सवात गोदावरी महाआरतीचा नासिकचा अभिमान; रामतीर्थ गोदावरी सेवा समितीला देशभरातून आमंत्रणाची पर्वणी

    Guardian Minister : आठ महिने झाले ; पालकमंत्रीपदाचा वाद सुटता सुटेना !

    आजी म्हणाली, रोहित उगवता तारा; पण काकाने सांगितले, भावकीने पडता पडता वाचाविला!!