• Download App
    सोलापूरकरांचा गैरसमज काढण्याचे काम अजितदादांनी दिले जलसंपदा विभागाला!! Ajit Pawar assigned the task of clearing the misunderstanding of Solapurkars to the Water Resources Department

    लाकडी निंबोडी योजना : सोलापूरकरांचा गैरसमज काढण्याचे काम अजितदादांनी दिले जलसंपदा विभागाला!!

     प्रतिनिधी

    बारामती : उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकर विरुद्ध बारामतीकर असे राजकीय वातावरण सध्या तापले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना जुनीच असल्याचे म्हटले आहे. लाकडी निंबोडी योजनेबाबत जलसंपदा विभागाने सोलापूर जिल्ह्यात लोकांचा गैरसमज दूर केला पाहिजे. इंदापूर तालुक्यातील लोकांचे हक्काचे पाणी इंदापूरकरांना देत आहोत, असे अजित पवारांनी बारामतीत सांगितले. Ajit Pawar assigned the task of clearing the misunderstanding of Solapurkars to the Water Resources Department

    इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी योजना फार जुनी योजना असून आता वर्क ऑर्डर निघाली आहे. सोलापुरातील माझे काही सहकारी त्याला विरोध करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील लोकांवर अन्याय होतो आहे, असे त्यांना वाटते आहे. मात्र, इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या पाण्याची नवीन जी योजना होती ती थांबली. त्यात थोडा वाद झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा गैरसमज झाला आहे. त्यांचा गैरसमज काढण्याचे काम जलसंपदा विभागाला करावे लागेल, असे अजित पवारांनी म्हटले आहे.



    अजित पवार म्हणाले की, त्या पाण्याचे वाटप झाले आहे. प्यायला किती शेतीला किती औद्योगिक क्षेत्राला किती त्याचे नियोजन झाले आहे. याच्या बातम्या मात्र वेगळ्याच आल्या. राष्ट्रवादीच्याही काही लोकांनी त्याला विरोध केला आहे. सगळ्यांचा गैरसमज जलसंपदा विभागाने दूर करावा.

    – लाकडी निंबोडी योजना

    •  योजनेतून इंदापूर तालुक्यातील 10 गावांमधील 4337 हेक्टर क्षेत्र आणि बारामती तालुक्यातील 7 गावांमधील 2913 हेक्टर क्षेत्र एकूण 7250 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
    •  30 वर्षांपासून योजना रखडली होती. ही योजना भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही
    •  निंबोडी उपसा सिंचन या योजनेस  348 कोटी 11 लाख  इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
    •   इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव परिसरातून साधारण  765 हॉर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडेच्या सीमेवर टाकले जाईल.
    •  640 हॉर्स पॉवरचे 3 पंप व 570 हॉर्स पॉवरचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील.
    •  मागच्या वर्षी वर्षी उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय झाला. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला त्यामुळे ती योजना रद्द करण्यात आली आहे.

    Ajit Pawar assigned the task of clearing the misunderstanding of Solapurkars to the Water Resources Department

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा