• Download App
    Suraj Chavan हिंसेला सोशल मीडियातून विरोध करून छावा संघटनेला "शांत" करायचा अजितदादांचा प्रयत्न; पण सुरज चव्हाणचे ना निलंबन, ना बडतर्फी, फक्त राजीनामा द्यायच्या सूचना!!

    हिंसेला सोशल मीडियातून विरोध करून छावा संघटनेला “शांत” करायचा अजितदादांचा प्रयत्न; पण सुरज चव्हाणचे ना निलंबन, ना बडतर्फी, फक्त राजीनामा द्यायच्या सूचना!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंसाचार मारहाण वगैरे प्रकारांचा सोशल मीडियातून निषेध करून छावा संघटनेला “शांत” करायचा प्रयत्न केला, पण मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण वर कारवाई करणार की नाही, याविषयी सुरुवातीला मौन बाळगले. त्यांनी सुरज चव्हाणचे निलंबन केले नाही किंवा त्याला बडतर्फही केले नाही, तर फक्त राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्याचवेळी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात मात्र मौन बाळगले. मराठा संघटनांच्या दबावापोटी अजितदादांनी हा निर्णय घेतल्याचे मानण्यात आले.

    कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळण्यावरून झालेल्या राजकीय वादाचे रूपांतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि संलग्न संस्थांच्या भांडणात झाले. सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे पाटील यांना मारहाण केली. या मारहाणीचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या समर्थन केले नाही. मात्र, सुरज चव्हाणने या मारहाणीचे समर्थन केले पण हे प्रकरण पेटलेले पाहताच माफी मागणारा व्हिडिओ शेअर करून तो फरार झाला. पोलिसांनी त्याच्या विरोधात लातूरच्या स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

    या सगळ्यातून राष्ट्रवादी अंतर्गतच मोठ्या संघर्ष उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले. एकतर माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर केला. त्यावरून छावा संघटनेने आंदोलन केले म्हणून सुरज चव्हाणने छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. हे सगळे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस आणि संलग्न संघटना यांच्यात घडले. पण त्यामुळे फडणवीस सरकारची बदनामी झाली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी त्याविषयावरचे मौन सोडले. त्यांनी सोशल मीडियातून हिंसाचाराचा आणि मारहाणीचा निषेध केला पण त्यामध्ये सुरज चव्हाणचे नावही घेतले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या हेतूविषयी शंका निर्माण झाली. अजित पवार हे सुरज चव्हाण वर कारवाई करणार की नाही?, असा संशय तयार झाला.

    सुरज चव्हाण यांच्या हिंसक कृतीमुळे सुनील तटकरे यांचा मराठवाडा दौरा अडचणीत सापडला. धाराशिव मध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा त्यांना घेरले. तटकरे यांना त्यांचे सगळे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे लागले. एवढे सगळे होऊनही अजितदादांनी सुरज चव्हाण वर थेट कुठली कारवाई न करता आणि त्याचे नावही न घेता फक्त हिंसेचा आणि मारहाणीचा विरोध नोंदविला‌ होता.

    अखेर अजित पवार यांनी आज दुपारी सोशल मीडिया अकाउंट वरून सुरज चव्हाण याला पदाचा राजीनामा द्यायला सांगितले. आपण सुरज चव्हाणला राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला सांगितल्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचे त्यांनी नमूद केले. पण त्यांनी सुरज चव्हाणला पक्षातून निलंबित किंवा बडतर्फ केले नाही. सुरज चव्हाण विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यावर पुढची कारवाई नेमकी काय करणार? हे देखील अजितदादांनी सांगितले नाही.

    Ajit Pawar asked Suraj Chavan only to resign from NCP youth wing Presidentship

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Pawar : रोहित पवारांचा आरोप- कलाकेंद्रात आमदाराच्या भावाचा गोळीबार; पोलिसांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

    Bachchu Kadu : बच्चू कडूंचा इशारा- शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली केल्यास ठोकून काढू, बँक मॅनेजरला फोनवरून धमकी

    Vijay Vadettiwar हनी ट्रॅप प्रकरणात विजय वडेट्टीवार यांचा आरोप : ५० मंत्री-अधिकाऱ्यांचा समावेश, लोढाकडून २०० कोटींची वसूली