• Download App
    Ajit pawar जनसन्मान यात्रेत अजितदादा बॅक फूटवर

    Ajit pawar : जनसन्मान यात्रेत अजितदादा बॅक फूटवर; हात जोडून मागितली महाराष्ट्राची माफी!!

    विशेष प्रतिनिधी 

    लातूर : महाराष्ट्रातल्या मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज्यात विरोधी पक्षात आक्रमक झाल्यावर उपमुख्यमंत्री जनसन्मान यात्रेत बॅक फूटवर आले. त्यांनी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची हात जोडून माफी मागितली. Ajit pawar apology for statue collapsed

    महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तत्पूर्वीच याठिकाणी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र उपस्थित होते. त्यामुळे, आदित्य ठाकरेंचा ताफा येताच राणे आणि ठाकरेंच्या समर्थकांमध्ये किल्ल्यावरच राडा झाला. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते आणि राणे पिता पुत्र समर्थकांमध्ये मालवणमध्ये राडा सुरू असतानाच दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवरुन राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागितली. अजित पवार यांनी लातूरात जनसन्मान यात्रेत भाषण करताना पुतळा दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही, असा इशाराही दिला.


    Jay Shah : जागतिक क्रिकेटवर भारताचा दबदबा; ICC च्या अध्यक्षपदी जय शाह; पाचवे भारतीय अध्यक्ष!!


    अजितदादा म्हणाले :

    मी कधीही विरोधकांवर टीका केली नाही, आम्ही कामची माणसे आहोत. आम्ही 15000 कोटींचे वीज बिल माफ केले. शेतकऱ्यांनी आता फक्त मोटर चालू करायची आहे, मागच्या वीज बिलाचा विचार करायचा नाही, बाकी मी पाहतो.

    राज्याचे बजेट 6.50 लाख कोटी रुपयांचे आहे, त्यातून आम्ही लाडक्या बहिणींसाठी वेगळे पैसे ठेवले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून मी काम करतोय मला माहिती आहे, कसे काम करायचे, असे म्हणत लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षांपर्यंत सुरू राहील.

    अजित पवारांनी मागितली माफी 

    छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला. मात्र, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या 13 कोटी लोकांची जाहीर माफी मागतो. यातील सर्व दोषी लोकांवर कडक कारवाई करू.

    या पुतळ्याचे काम चांगलेच झाले पाहिजे होते, हे सर्व लोक राष्ट्रनिर्मिती करण्यात अग्रेसर राहिले आहेत. त्यांचे विचार कायमच आपणास प्रेरणा देत असतात, यातील जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही. आज शब्द देतो की अशी चूक पुन्हा होऊ, नये यासाठी काम करू.

    बदलापूरला दुःखद घटना घडली आहे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायम काम करू. महिला सुरक्षेसाठी कायमच प्राधान्य देऊ. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील दोषींना फाशी आणि जन्मठेप सुनावण्यात येणार आहे.असली विकृती पुन्हा कोणी करू नये, यासाठी कायदा आणखीन कडक केला जात आहे, कोणत्याही पातळीवर हायगय केली जाणार नाही. कोणी हायगय केली तर तोही जेलमध्ये टाकला जाणार आहे.

    Ajit pawar apology for statue collapsed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मनोज जरांगेंच्या तोंडी सरकार उलथवण्याची भाषा; ते विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार देणार होते त्याचे काय झाले??

    Supriya Sule : मांसाहाराच्या वक्तव्यावरून भाजपची सुप्रिया सुळेंवर टीका, आचार्य तुषार भोसले म्हणाले- असे विधान निव्वळ मूर्खपणा

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका, मतदारयाद्या तपासण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना