विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरी फूट पडली आहे का??, पवार काका – पुतणे खरंच वेगळे झाले आहेत का??, की एकीकडे सत्तेची फळे चाखून दुसरीकडे त्यात सत्तेच्या विरोधात खेळण्या करत महाराष्ट्राच्या जनतेला पवार काका – पुतणे हुल देत आहेत??, असा खात्रीशीर संशय महाराष्ट्राच्या जनतेला असताना स्वतः शरद पवारांनी वेगळ्या शब्दांत त्यावर शिक्कामोर्तब केले. Ajit pawar and his colleagues will not be able to return to NCP, sharad pawar accepts the fact
अजित पवार आणि त्यांचे सहकारी भाजपा बरोबर जाण्यापेक्षा ते सत्तेबरोबर गेले आहेत आणि नरेंद्र मोदी सत्तेवर असेपर्यंत अजितदादा आणि त्यांचे सहकारी आपल्या राष्ट्रवादीत परत येण्याची शक्यता नाही, अशी कबुली शरद पवारांनी दिली. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी राष्ट्रवादीतील फुटी संदर्भात सविस्तर भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले :
- राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाच्या वर्चस्वाच्या मुद्द्यावर फुटला हे मला मान्य नाही. कशामुळे फुटला याची चर्चा नेहमी होते. राष्ट्रवादीवरच्या वर्चस्वाच्या मुद्द्यावर पक्ष फुटला नाही, तर केंद्रीय तपास संस्थांचे विविध भ्रष्टाचारांच्या चौकशी आणि तपासाचे जे उद्योग सुरु होते, त्यामुळे अनेक सहकारी अस्वस्थ झाल्याने त्यांनी हे कृत्य केले. काही नेत्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत अवघड झाली होती.
- 2019 मध्ये अजित पवारांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली होती, पण त्यावेळी त्यांनी चूक कबूल केली म्हणून त्यांना परत संधी दिली. पण आता जर कोणी परत येऊ इच्छित असेल, तर प्रत्यक्षात त्यांनी इच्छा केली व्यक्त केल्यानंतर त्याबाबत निर्णय घेऊ. पण जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सत्तेवर आहेत तोपर्यंत राष्ट्रवादीतले जुने सहकारी परत आपल्याकडे येण्याची शक्यता मला वाटत नाही.
- बारामतीतून कुणाला उभे करायचे हा अधिकार अजित पवारांचा आहे. त्याबद्दल भाष्य करण्याचे कारण नाही, पण बारामतीची जागा जिंकून आणलीच पाहिजे, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवारांना दिल्याची दिल्लीच्या वर्तुळात चर्चा आहे, अशी आमची माहिती आहे, पण शेवटी बारामतीचे मतदाराची काय तो निर्णय घेणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ज्या पद्धतीने तुरुंगात टाकले, त्यामुळे मी पंतप्रधान मोदींची तुलना पुतीन यांच्याशी केली.
Ajit pawar and his colleagues will not be able to return to NCP, sharad pawar accepts the fact
महत्वाच्या बातम्या
- केरळच्या डाव्या आमदाराची राहुल गांधींवर टीका, DNA टेस्ट करून घ्या; गांधी आडनाव लावण्याचा अधिकार नाही!
- माढात पुन्हा ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात; फलटणमध्ये रामराजे माईक निंबाळकर यांचे यांचे कुटुंब मोहिते पाटलांच्या गोटात!!
- नूडल्सच्या पॅकेटमध्ये हिरे अन् अंडरगारमेंटमध्ये आढळले सोने!
- काँग्रेसचे परराष्ट्र धोरणही व्होट बँक पॉलिटिक्स आणि तुष्टीकरणाचे; जयशंकरांनी उदाहरणांसकट काढले वाभाडे!!