विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पंचामृत बजेटमुळे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना पळीभर पंचामृत आठवले आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्पात महाविकास आघाडीतल्या पक्षांना पळीभर पंचामृत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रसाद, पण भाजपला मात्र महाप्रसाद दिल्याचा आरोप अजितदादा आणि छगन भुजबळ यांनी विधानसभेत केला आहे.Ajit Pawar and chagan Bhujbal targets devendra fadnavis over allocation of funds in budget, but NCP itself discriminated in allocation of funds in MVA regime
पळीभर पंचामृत, प्रसाद आणि महाप्रसाद असे शब्द वापरून अजितदादा आणि भुजबळ यांनी फडणवीस यांनी अर्थसंकल्पातला निधी वाटप करताना कसा भेदभाव केला आहे, याचेच वर्णन केले आहे. फडणवीस अद्याप या आरोपाला उत्तर द्यायचे आहेत. पण जे अजितदादा आणि भुजबळ फडणवीसांवर अर्थसंकल्पातल्या निधी वाटपाबाबत भेदभाव केल्याचा आरोप करत आहेत, त्यांच्याच महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांना कशा पद्धतीने निधी वाटप होते??, याच्या बातम्या साधारण वर्षभरापूर्वीच आल्या होत्या आणि त्यामध्ये राष्ट्रवादीने स्वतःच्या आमदारांना सर्वाधिक निधी दिल्याचे आकडे त्या बातम्यातून दिसत होते.
राष्ट्रवादीकडे 54 आमदार असताना त्यांना सर्वाधिक निधी, काँग्रेसकडे 44 आमदार असताना त्यांना दुसऱ्या नंबरचा निधी आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री, शिवाय 56 आमदार असताना त्यांना सर्वात कमी निधी राष्ट्रवादीचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्याच्या बातम्या आकडेवारीनिशी माध्यमांनी दिल्या होत्या. आज जरी अजितदादा आणि भुजबळ यांना महाविकास आघाडीला दिलेले पळीभर पंचामृत दिसत असले, तरी त्यांच्या सत्ता काळात मात्र त्यांनी आपल्याच सरकारमधील घटक पक्षांना याच स्वरूपाने निधी वाटला होता हेच हे दोन्ही नेते विसरल्याचे दिसत आहेत!!
महाविकास आघाडीतले निधी वाटप
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधीवाटपात मात्र शिवसेना तिसऱ्या स्थानी होती. काँग्रेसही शिवसेनेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी होती. तर अर्थ खाते असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच राज्यात निधीवाटपात अव्वलस्थानी होता.
आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्याकडूनही ४२० कोटींची तरतूद असूनही आतापर्यंत फक्त 3 % टक्के म्हणजे १४ कोटींचा खर्च करण्यात आला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या खात्याची ही अवस्था असेल तर शिवसेनेच्या अन्य मंत्र्याचे काय??, असा प्रश्न शिवसेनेच्याच आमदारांनी उपस्थित केला होता.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये निधी वाटपातही मोठी असमानता होती. एबीपी माझाच्या बातमीनुसार, २०२० ते २१ या वर्षातील निधीवाटपाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक आमदार असणारा आणि मुख्यमंत्रीपद असणारा शिवसेना पक्ष मात्र पिछाडीवर होता.
महाविकास आघाडीतील निधी असमानता
शिवसेना ५९ आमदार : निधी ५२२५५ कोटी
काँग्रेस ४३ आमदार : निधी १०००२४ कोटी
राष्ट्रवादी काँग्रेस ५३ आमदार : निधी २२४४११ कोटी
या आकडेवारीवरून सर्वाधिक आमदार आणि मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला सर्वात कमी निधी मिळाला आहे, तर 5 आमदार कमी असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळविण्यात मात्र सर्वात अव्वल होती. शिवसेनेपेक्षा चौपट जास्त निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना मिळाला होता, असे आकडेवारीच सांगत होती.
आणि आता सरकार बदलल्यानंतर याच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार आणि छगन भुजबळ यांनी फडणवीसांना पळीभर पंचामृत, प्रसाद आणि महाप्रसाद अशा शब्दांनी डिवचले आहे. फडणवीस यावर काय उत्तर देतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ajit Pawar and chagan Bhujbal targets devendra fadnavis over allocation of funds in budget, but NCP itself discriminated in allocation of funds in MVA regime
महत्वाच्या बातम्या
- American Visa Application : अमेरिकेची मोठी घोषणा, यावर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा देणार
- भूषण देसाईने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात चौकशीसाठी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमची स्थापना
- ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात; गजानन कीर्तीकरांचा मुलगा ठाकरे गटात; सुभाष देसाईंचा मुलगा शिंदे गटात!!