विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : वय झालंय आता रिटायरमेंट घ्या, असा सल्ला अजित पवारांनी काकांना देऊन पाहिला, पण काकांनी तो सल्ला ऐकता फाट्यावर मारला. पण त्यामुळे काकांचीच राष्ट्रवादी फुटली आणि पुतण्याला भाजपच्या सत्तेची वळचण धरावी लागली. पण काका रिटायर होणार नव्हते, ते झाले नाहीच!!
त्यामुळे आता काकांच्या नादी लागायचे सोडून अजित पवारांनी चंदगडच्या के. पी. पाटलांना रिटायरमेंट घेण्याचा सल्ला देऊन टाकला. 2029 च्या निवडणुकीपर्यंत तुम्ही 84 वर्षांचे होणार आहात त्यामुळे आता रिटायरमेंट घ्या आणि नवीन नेतृत्व तयार करा, असे अजित पवार के. पी. पाटलांना म्हणाले. तुम्ही आपापसांत भांडत म्हणून चंदगड मध्ये राजेश पाटलांचा पराभव झाला. तर सगळे एक राहिला असतात तर वेगळी चित्र दिसले असते, असेही अजित पवार म्हणाले.
के पी पाटील सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत पण ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्याने अजित पवारांनी के. पी. पाटलांची चंदगड मध्ये भेट घेऊन त्यांना रिटायरमेंटचा सल्ला दिला. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत थांबणार होतो पण लोकांच्या आग्रहामुळे विधानसभेला उभा राहिलो, असा खुलासा के. पी. पाटलांनी अजित पवारांसमोर केला. पण रिटायरमेंट विषयी ठामपणे त्यांनी कुठले आश्वासन दिले नाही.
Ajit Pawar advice to K. P. Patil; You are going to be 84.
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : पाकिस्तानात घुसून मारताना भारतीय सैन्य दलांमध्ये आता राजकीय हस्तक्षेप नाही, पण तो केव्हा आणि कुणी केला होता??
- PM Modi : पाकिस्तानला धडा शिकवायचे भारतीय सैन्य दलांना संपूर्ण स्वातंत्र्य, कारवाईत कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही!!
- Gujarat : गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठी बुलडोझर कारवाई!
- Kashmir : गुलमर्ग ते दल सरोवरापर्यंत, काश्मीरमधील ४८ पर्यटन स्थळे बंद