प्रतिनिधी
जळगाव : मोठमोठे राजकीय पक्ष वेगवेगळ्या कारणांवरून आंदोलने करत असतात. ती छोटी – मोठी, असरट – पसरट कशीही असली आणि फसली तरी अनेकदा ती गाजत असतात!! असेच एक आंदोलन सोशल मीडियावर सध्या गाजत आहे आणि त्यावरून नेटिझन्स खिल्ली देखील उडवत आहेत.Ajit Dad’s (N) Speech: But (N) Where ??, Dehut Ki Juhut ??; NCP’s agitation became ridiculous !!
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. हा महाराष्ट्राचा अपमान झाला असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी हा विषय उचलून धरल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जोरदार जोर चढला. त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. पण यातले जळगावचे आंदोलन सोशल मीडियावर जोरदार चर्चेचे ठरले आहे.
कारण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पण नेमकी आंदोलन कशासाठी करतो आहे हेच कळलेले दिसले नाही. अजितदादांचे भाषण झाले नाही ते देहूत. पण जळगावच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात फलक झळकावला तो “जुहूत”!! एवढे करूनही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थांबले नाहीत. त्यांनी फलकावर “देहू” ऐवजी “जुहू” हा शब्द वापरलाच, पण कंसात “मुंबई” देखील लिहून टाकले.
म्हणजे अजितदादांचे (न)झालेले भाषण देहूतले होते, जुहूतले नव्हते, हे देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गावीही नव्हते. जळगावच्या आंदोलनाचे कव्हरेज करायला गेलेल्या पत्रकारांनी कार्यकर्त्यांना ही चूक लक्षात आणून दिली. परंतु तो पर्यंत त्या फलकाचा फोटो एवढा व्हायरल झाला की अनेकांनी राष्ट्रवादीच्या त्या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवली.
Ajit Dad’s (N) Speech: But (N) Where ??, Dehut Ki Juhut ??; NCP’s agitation became ridiculous !!
महत्वाच्या बातम्या
- दानवे × देसाई : राज्यसभा निवडणुकीत “घोडे” गाजले; विधान परिषद निवडणुकीत “मांजराची पिल्लं” गाजताहेत!!
- देहूतील (न)भाषण : अजितदादा म्हणाले, विषय संपला!!; फडणवीस म्हणाले, अजितदादांच्या विरुद्ध राष्ट्रवादीतून षडयंत्र!!
- महाराष्ट्र भाजप : बारामतीत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी “राजकीय वात” राम शिंदेंच्या हाती!!