प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याचे पडसाद महाराष्ट्रात आजही उमटत असून, याची सुरुवात ज्या अंजली दमानिया यांनी मंत्रालयातील चर्चेपासून केली होती. त्याच अंजली दमानियांनीच महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत काय घडेल?, याची “भविष्यवाणी” केली आहे.Ajit Pawar may unite his supporter MLAs during diwali and switch over to BJP, claims anjali damania
शरद पवारांची निवृत्ती मागे घेण्याची खेळी अजित पवारांना रोखण्यासाठीच केली असली आणि त्यामुळे अजित पवारांचे ना घर का ना घाट का असे झाले असले, तरी ते दिवाळीपर्यंत आपल्या गटातले आमदार एकत्र करतील आणि मोठा दगा फटका करतील, असे वक्तव्य अंजली दमानिया यांनी केले आहे. अजितदादांच्या राजकीय खेळ्या खुद्द त्यांना माहिती असण्याच्या आधीच अंजली दमानियांनाच माहिती झाल्याचे यातून दिसून येते.
अंजली दमानिया यांनी साधारण महिनाभरापूर्वी मंत्रालयातील एका चर्चेसंदर्भात एक ट्विट करून “विशिष्ट बातमी” फोडली होती. मंत्रालयात सध्याचे शिंदे – फडणवीस सरकार बदलाच्या हालचाली सुरू आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जुळवून घेऊन मुख्यमंत्री होण्याच्या बेतात आहेत, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र अद्याप तरी तसे काही घडलेले नाही.
पण आता त्या पलीकडे जाऊन शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यासंदर्भात अंजली दमानिया यांनी त्यांच्या स्टाईलने भाष्य केले आहे. अजितदादा हे शरद पवारांच्या खेळीने सध्या जरी सैरभैर झाले असले, तरी ते दिवाळीपर्यंत आपल्या गटाच्या आमदारांना एकत्र करतील आणि मोठा दगाफटका करून भाजप बरोबर जातील, असे “भविष्य” त्यांनी वर्तविले आहे.
एवढे असूनही स्वतः अजित पवारांनी या प्रकारचे अधिकृत वक्तव्य कधीही केलेले नाही. तसेच त्यांनी आपली राजकीय खेळी देखील कधी उघड केलेली नाही. पण त्यांच्यापेक्षा अंजली दमानिया यांनाच अजितदादांच्या राजकीय खेळीची जास्त माहिती असल्याचे त्यांनी केलेल्या “भविष्यवाणी”वरून दिसून येते.
Ajit Pawar may unite his supporter MLAs during diwali and switch over to BJP, claims anjali damania
महत्वाच्या बातम्या
- बारसूत रिफायनरी प्रकल्प केला, तर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र पेटवण्याची भाषा
- कोविड ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही, WHO प्रमुख म्हणाले – एका वर्षापासून रुग्णसंख्येत होतेय
- कुस्तीपटूंच्या संपाचा 14 वा दिवस, FIRमध्ये 5 घटनांचा उल्लेख, बहाण्याने पोट आणि स्तनांना स्पर्श केला, वैयक्तिक नंबर मागितला
- राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा कर्नाटकात फक्त सीमावर्ती भागात प्रचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 3 दिवसांचा विस्तृत कर्नाटक दौरा!!