• Download App
    अजय देवगणचा ‘तान्हाजी’ आता स्टार प्रवाहवर मराठीतून पाहण्याची प्रेक्षकांना संधी !|Ajay Devgn's 'Tanhaji' now a chance for viewers to watch in Marathi on Star Pravah!

    अजय देवगणचा ‘तान्हाजी’ आता स्टार प्रवाहवर मराठीतून पाहण्याची प्रेक्षकांना संधी !

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्रात १५ दिवसांची संचारबंदी लागू झाल्यापासून मालिका आणि सिनेमांचं शूटिंग बंद झाले आहे. दुसरीकडे मनोरंजनात नवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी मनोरंजनाचा डबल धमाका घेऊन येत आहे. अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पहाण्याची संधी प्रेक्षकांना देणार आहे.Ajay Devgn’s ‘Tanhaji’ now a chance for viewers to watch in Marathi on Star Pravah!

    तानाजी मालुसरे यांनी जीवाची पर्वा न करता कोंढाणा सर केला. या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमातून दाखवली आहे. हा दैदिप्यमान इतिहास मराठीत पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहवर २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता हा सिनेमा मराठीतून प्रेक्षकांना पाहता येईल.



    अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्यासोबतच अजिंक्य देव, शरद केळकर, देवदत्त नागे आणि दिग्दर्शक ओम राऊत अशी अनेक मराठी नावं या सिनेमासोबत जोडली आहेत. कलाकारांच्या उत्तम अभिनयासोबतच दमदार गाणी, अजय-अतुल यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स हे सारं प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे.

    मायबोली मराठीमध्ये हा सिनेमा स्टार प्रवाहवर प्रक्षेपित करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी आहे.
    सतीश राजवाडे, कार्यक्रम प्रमुख , स्टार प्रवाह

    Ajay Devgn’s ‘Tanhaji’ now a chance for viewers to watch in Marathi on Star Pravah!

     

    Related posts

    महाराष्ट्रातल्या कौशल्य विकासासाठी दक्षिण कोरियातल्या लर्निंग फॅक्टरी मॉडेलची मदत; अनेक करारांवर स्वाक्षऱ्या!!

    राष्ट्रवादीवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!

    Piyush Goyal : भारताची टॉफी निर्यात 12 वर्षांत 166% वाढली; आर्थिक वर्ष 2026 मध्ये ₹132 कोटींवर, मंत्री पीयूष गोयल यांनी डेटा जारी केला