- शास्त्रीय-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी म्हणजे वेरूळ-अजिंठा महोत्सव.
- अवघ्या जगाचे लक्ष वेधणारा औरंगाबादचा वेरूळ महोत्सव बंद होऊन 5 वर्ष झाली आहेत.
- जानेवारी महिन्यात अजिंठा महोत्सव आयोजनाची तयारी सुरु आहे.
विशेष प्रतिनिधी
औरंगबाादः ऐतिहासिक अजंठा एलोरा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असते . औरंगाबादच्या वेरुळ महोत्सवात (Ellora Festival) 2017 पासून खंड पडला. त्यातच कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून पर्यटन क्षेत्राची अवस्था कोलमडली आहे. AJANTHA FESTIVAL: Ajanta Festival in the month of January in Aurangabad! Trail of cultural events
पर्यटनाला आणि एकूणच ऐतिहासिक औरंगाबाद नगरीला उभारी देण्यासाठी यंदा जानेवारी महिन्यात भव्य अशा अजिंठा महोत्सवाचे (Ajanta Festival) आयोजन करण्यात येणार आहे. महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याविषयीच्या सूचना विभागीय आयुक्तालयातील बैठकीत दिल्या. तसेच पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासाठी या महोत्सवाचे काटेकोरपणे नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिल्या.
‘सरस’ प्रदर्शन
मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, हे वर्ष आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर अजिंठा लेणी परिसरात महिला समूहाच्या उत्पादनांचे सरस प्रदर्शनाचे आयोजन करावे. त्यासोबतच पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी लेणी परिसरात यंदा अजिंठा महोत्सव भरवण्यात यावा. या प्रदर्शनासह महोत्सवासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेने निधीसह परिपूर्ण नियोजन करून प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दरवर्षी अजिंठा महोत्सवच!
औरंगाबादच्या सांस्कृतिक ठेव्याची आठवण करून देणारा वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या परंपरेत 2017 नंतर खंड पडला होता. 2016 साली हा महोत्सव घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यात ब्रेक लागला होता. यंदाही वेरूळ-अजिंठा ऐवजी अजिंठा महोत्सवाचेच नियोजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव यशस्वी झाला तर दरवर्षी अजिंठा महोत्सव घेतला जाईल, असे संकेतही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
AJANTHA FESTIVAL: Ajanta Festival in the month of January in Aurangabad! Trail of cultural events
महत्त्वाच्या बातम्या
- बिग बॉस मराठी 3 : ‘ या ‘ कारणामुळे महेश मांजरेकरांनी सोडला बिग बॉस मराठी कार्यक्रम
- पुणे तिथे काय उणे ! देशाची पहिली हायड्रोजनवर चालणारी बस विकसित
- जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हिजबुलच्या दहशतवाद्याचा खातमा
- गुगल कंपनीने कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले बंधनकारक
- School Reopen : आज नागपूर तर सोमवारपासून औरंगाबादच्या शाळांची घंटा वाजणार ! कडक नियम-पालक मात्र संभ्रमात
- क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज