• Download App
    रेहान बीफ शॉप झिंदाबाद, काटते रहो म्हणणाऱ्या AIMIM च्या असदुद्दीन ओवैसींचा कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा!!|AIMIM's Asaduddin Owaisi who says Rehan Beef Shop Zindabad, Katte Raho supports Shahu Maharaj in Kolhapur

    रेहान बीफ शॉप झिंदाबाद, काटते रहो म्हणणाऱ्या AIMIM च्या असदुद्दीन ओवैसींचा कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा!!

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे प्रचार दौऱ्यामध्ये रेहान बीफ शॉप झिंदाबाद, काटते रहो म्हणणाऱ्या AIMIM पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. ओवैसींच्या पाठिंबामुळे शाहू महाराजांची ताकद वाढल्याचा दावा मराठी माध्यमांनी केला आहे.AIMIM’s Asaduddin Owaisi who says Rehan Beef Shop Zindabad, Katte Raho supports Shahu Maharaj in Kolhapur

    पण असदुद्दीन ओवैसी हैद्राबाद इथल्या प्रचारादरम्यान एका वक्तव्यामुळे प्रचंड वादग्रस्त ठरले. त्यांच्याविरुद्ध हिंदू समाजात संताप उसळला.



    त्याचे झाले असे :

    हैदराबाद मध्ये प्रचार दौऱ्यामध्ये असदुद्दीन ओवैसी एका मोहल्यात पोहोचले. तिथे रेहान नावाचे बीफ शॉप होते. असदुद्दीन ओवैसी तिथे गेले. त्यांनी रेहान बीफ शॉप असे नाव वाचले. रेहान बीफ शॉप झिंदाबाद, काटते रहो, असे ते म्हणाले. बीफ शॉपच्या मालकाशी ओवैसींनी शेकहँड केला. ओवैसींचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे सगळीकडून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. हैदराबादच्या भाजप उमेदवार माधवी लता यांनी ओवैसी यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठीच ओवैसी रेहान बीफ शॉप जिंदाबाद काटते रहो, असे म्हणाल्याचा आरोप त्यांनी केला. यातून ओवैसींची देश विरोधी आणि हिंदू विरोधी मानसिकताच दिसली, असे त्या म्हणाल्या. सोशल मीडियावर देखील ओवैसींना अनेकांनी ट्रोल केले.

    पण आता त्याच असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन अर्थात AIMIM या पक्षाने कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरात आधीच शाहू महाराज अस्सल की दत्तक हा वाद उसळला आहे. शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार संजय मंडलिकांनी शाहू महाराज दत्तक असल्याचे वक्तव्य केल्याने ते वादग्रस्त ठरले, पण संजय मंडलिक आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. कोल्हापुरातले त्यांचे सगळे समर्थक सातत्याने शाहू महाराज दत्तक असल्याचा प्रचार करत राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांना असदुद्दीन ओवैसी यांनी पाठिंबा दिल्याने कोल्हापूरच्या लढतीत मधल्या वादग्रस्ततेत अधिकच भर पडली आहे. पण मराठी माध्यमांनी मात्र ओवैसींच्या पाठिंब्यामुळे कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढल्याचा “जावईशोध” लावला आहे.

    AIMIM’s Asaduddin Owaisi who says Rehan Beef Shop Zindabad, Katte Raho supports Shahu Maharaj in Kolhapur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ