• Download App
    Ahmednagar hospital fire : अमित शहा यांचे ट्विट; म्हणाले.. । Ahmednagar hospital fire : Amit Shahs Twitt

    Ahmednagar hospital fire : अमित शहा यांचे ट्विट; म्हणाले..

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाच्या (ahmednagar hospital fire) आयसीयू (ICU) विभागाला आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. Ahmednagar hospital fire : Amit Shahs Twitt

    आयसीयू विभागात 17 जणांवर उपचार सुरु होते. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले .

    दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह (amit shah) यांनी ट्विट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत

    अमित शहांनी दु:ख व्यक्त केले…

    अहमदनगर, महाराष्ट्रातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या हृदयद्रावक घटनेमुळे अतिशय दु:ख झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगी, माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि मी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.

    कुटुंबियांना 5 लाखांची मदतीची घोषणा

    अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी 10 वाजताच्या सुमारास लागली असल्याची माहिती आहे. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार असल्याची माहिती मिळत आहे. अहमदनगरमध्ये लागलेल्या आगीमध्ये 17 रूग्णांपैकी 7 रूग्णांना वाचवण्यात यश आलं आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. ही घटना दुर्देवी असून जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे.या प्रकरणाबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ” ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यात येण्याचे आदेश केले असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

    Ahmednagar hospital fire : Amit Shahs Twitt

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा