विशेष प्रतिनिधी
मुंबई : हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकीका स्पर्धा ‘ अहमदनगर महाकरंडक २०२२, उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा’ ची महाअंतिम फेरी अहमदनगर येथील माऊली सभागृहात २६ ते २९ एप्रिल दरम्यान जल्लोषात रंगणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षं स्पर्धा होऊ शकली नव्हती. पण दोन वर्षांचा गॅप पडूनही यंदा स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद उल्लेखनीय आहे. Ahmednagar Grand Trophy 2022 Final Round between 26th to 29th April
अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि झी-मराठीच्या सहयोगाने होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रात झालेल्या प्राथमिक फेरीतून १२० एकांकिकांमधून तब्बल ३३ एकांकिकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे.
पुणे, मुंबई, नाशिक, इस्लामपूर, जळगाव, धुळे, अमरावती, कोल्हापूर आणि नागपूर या केंद्रांवरील प्राथमिक फेरीतील विजेते संघ अंतिम फेरीत दाखल झाले असून २६ ते २८ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते रात्री १० आणि २९ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत अंतिम फेरीतील एकांकिकांचे प्रयोग अहमदनगर येथील माऊली सभागृहात होतील.
२९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता बक्षीस समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री – निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता – दिग्दर्शक अद्वैत दादरकर असणार आहेत.
यावेळी मराठी आणि हिंदीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवतील. त्यामुळे नाट्यप्रेमींनी कलेच्या या उत्सवात सहभागी होऊन उत्तम एकांकिकांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केले आहे.
Ahmednagar Grand Trophy 2022 Final Round between 26th to 29th April
महत्त्वाच्या बातम्या
दगडफेक कोणी केली हा तपासाचा भाग; दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य
- पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव सुरू
- दिल्लीत आजपासून पारा ४४ ते ४६ अंशावर
- ईडी, सीबीआयचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत, शरद पवार यांचा आरोप
- शरद पवार सुधारत नसल्यानेच महाविकास आघाडीतून बाहेर, राजू शेट्टी यांनी सांगतिले कारण
- भीती वाटली की शिवसैनिक सत्तेचा विषय आला की मात्र आठवत नाही, नारायण राणे यांची टीका