अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील सोलापूर वाडी ते आष्टी यादरम्यान रेल्वेची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दोन वर्षापासून हे काम अखंडपणे सुरू होते. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील ६१ किमी पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर हायस्पीड ट्रायल घेतली जात आहे. यासाठी दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी आले आहेत. Ahmednagar-Beed-Parli railway 61 km speed trial begins, Pritam Mundes presence, Pankaj thanked Modi Fadnavis
विशेष प्रतिनिधी
बीड : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील सोलापूर वाडी ते आष्टी यादरम्यान रेल्वेची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दोन वर्षापासून हे काम अखंडपणे सुरू होते. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील ६१ किमी पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर हायस्पीड ट्रायल घेतली जात आहे. यासाठी दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी आले आहेत.
बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते. या परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून या रेल्वे मार्गावर कामाने वेग घेतला. यामुळे आष्टीपर्यंतची रेल्वेचे कामे पूर्ण झाली आहे. एकूण 61 किलोमीटर अंतराचा असलेला हा टप्पा पूर्ण केला. या मार्गावर सोलापूरवाडी हे स्टेशन तयार करण्यात आले आहे. येथून दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी मनोज अरोरा यांच्या हस्ते या स्टेशनवर पूजा करण्यात आली. त्यानंतर या संपूर्ण 61 किमी अंतराच्या तपासणीस सुरुवात झाली. यासाठीची मोठी रेल्वे या रुळावर धावली. अधिकारी संपूर्ण रुळाची, पुलांची आणि सर्वांची पाहणी केल्यानंतर आष्टी येथून या हाय स्पीड ट्रायलला सुरुवात होणार आहे. त्यासाठी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित आहेत.
याप्रसंगी खासदार प्रीतम मुंडे यांनीही माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, आज माझ्या एकटीच्या दृष्टीने नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. मुंडे साहेबांचे हे स्वप्न होतं, अनेकांनी यासाठी प्रयत्न केलं. अनेकांनी या लढ्यात योगदान दिलं आहे. मुंडे साहेबांच्या रूपात पहिल्यांदा या रेल्वेला भरघोस असा निधी मिळाला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने या रेल्वेला खऱ्या अर्थाने या रेल्वेला गती दिली. राज्यात भाजप सरकार असताना पंकजाताई पालकमंत्री होत्या. त्यावेळी आम्हाला राज्याला पन्नास टक्के हिस्सा वेळेत मिळत राहिला. त्यामुळेच आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हावासीयांचे अभिनंदन करते.”
दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, उद्या एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये !!! माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली डॉ. प्रीतम मुंडे अजून एक रेकॉर्ड तुमच्या नावावर… धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी, सुधीर मुनगंटीवारजी आणि नरेंद्र मोदीजी. आमच्या शब्दाला पूर्ण करण्यात योगदान दिले.. धन्यवाद!!”
Ahmednagar-Beed-Parli railway 61 km speed trial begins, Pritam Mundes presence, Pankaj thanked Modi Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या
- चर्चा काँग्रेसचा झेंडा पडल्याची, पण 60 वर्षानंतरच्या गांधी घराण्याला शास्त्री घराण्याची आठवण झाली, त्याची चर्चा का नाही??
- चाळीसगाव : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
- लष्कर भरती प्रक्रियेतील फसवणुकीचा ‘मिलिटरी इंटेलिजन्स’कडून पर्दाफाश, तोतया मेजरला अटक
- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख मुख्य आरोपी; ईडीचे कोर्टात 7000 पानी पुरवणी आरोपपत्र