विशेष प्रतिनिधी
इचलकरंजी : कृषी धोरणांतर्गत इचलकरंजीतील महावितरणाच्या अब्दुललाट शाखेमधील ४५ कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी ५० टक्के अनुदानाचा लाभ घेतला. ११ लाख १८ हजार रुपयांचे थकीत वीजबिल त्यांनी एकरकमी भरले. त्याचबरोबर या अनुदानाचा लाभ घेतला त्याबद्दल कोल्हापूर परिमंडळ अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार केला गेला.
agricultural pump holders in Ichalakaranji division has good news
थकबाकीचा भरणा केल्यास ५०% अनुदान देण्याचे कृषी धोरण जाहीर करण्यात आले. या अनुदानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी गेल्यावर्षीपासूनचा कृषीपंपातील थकबाकीचा भरणा केला. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी महावितरणकडून मेळावे घेतले जात होते व त्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले गेले. पहिल्याच टप्प्यात अब्दुललाट शाखेअंतर्गत येणाऱ्या शिवनाकवाडी, लाटवाडी आणि शिरदवाड या गावांतील ४५ शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. आजतागायत या शाखेतील ११९२ शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे.
उद्या गरज पडल्यास कृषी कायदे पुन्हा आणले जातील : राज्यपाल कलराज मिश्रा
महावितरणकडून घेतल्या गेलेल्या मेळाव्यामध्ये इचलकरंजी विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुनील आकीवाटे, सुभाष बिरनाळे, लिपिक दगडू हंकारे, कार्यकारी अभियंता प्रशांत राठी आणि शाखा अभियंता शिवराज पाटील यांच्याबरोबर इतर गावकरी उपस्थित होते.
agricultural pump holders in Ichalakaranji division has good news
महत्त्वाच्या बातम्या
- सौदी अरेबियाच्या अनेक शहरांवर हल्ला, हौथी बंडखोरांनी बॉम्बने लादलेल्या १४ ड्रोनचा वापर केला, तेल रिफायनरीसह विमानतळ लक्ष्य
- युरोपमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तडाखा, ऑस्ट्रियात लॉकडाऊन; जर्मनीमध्ये संकट
- पुण्याच्या प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरची इमारतीवरून उडी मारून लाईव्ह आत्महत्या; घटनेमुळे उडाली खळबळ
- इंदुरीकर महाराजांनी जालना जिल्ह्यातून कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास केली सुरुवात ; म्हणाले…..
- रक्तातच देशसेवा, पती दहशतवादी हल्यात शहीद झाल्यावर पत्नी झाली लष्करी अधिकारी, दोन मुलांची आई
- हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी धर्म बदलविण्याची गरज नाही; पण आपल्या लोकांचाही धर्म बदलवू देऊ नका, सरसंघचालकांचे आवाहन