• Download App
    शेतकऱ्यांना टोपी घालण्यात पवार - मोदी यांच्यात एकमत; राजू शेट्टींची घणाघाती टीका । Agreement between Pawar and Modi in wearing hats to farmers; Raju Shetty's harsh criticism

    शेतकऱ्यांना टोपी घालण्यात पवार – मोदी यांच्यात एकमत; राजू शेट्टींची घणाघाती टीका

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : बाकी कशात नसले तरी शेतकऱ्यांना टोपी घालण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एकमत असल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. Agreement between Pawar and Modi in wearing hats to farmers; Raju Shetty’s harsh criticism

    कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे उद्या ऊस परिषद होत आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या बैठका घेत आहेत. यापैकी आजरा येथील बैठकीत बोलताना राजू शेट्टी यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांना एफआरपी देण्याबाबत कोणतेही सरकार असले तरी आखडता हात घेण्याचे धोरण दिसते. मोदी सरकारला एफआरपी एकरकमी न देता ती तोडून द्यायची आहे. याबाबत शरद पवार यांचे मोदी सरकारशी एकमत आहे. शेतकऱ्यांना टोपी घालायची म्हटले की हे दोन्ही नेते एकत्र होतात, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.



    शरद पवारांना साखरकारखान्यांच्या कर्जाची काळजी आहे. पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची काळजी नाही. साखर कारखान्यांचे कर्ज फेडता आले नाही तर कारखाने अवसायनात काढण्यात येतात पण शेतकऱ्याला कर्ज फेडायचे भेटता आले नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचे याची चिंता पवारांना नाही. एफआरपी एकरकमी देता येणार नाही असे पवार सांगतात. पण कारखाने विकताना रकमा रकमा एकरकमी घेतात, अशा शेलक्या शब्दात राजू शेट्टी यांनी पवारांचा समाचार घेतला.

    जयसिंगपूर मधल्या उद्याच्या ऊस परिषदेला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सरकार कोणतेही असले तरी शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात काम करत असेल तर शेतकऱ्यांचा मोठा दबावगट तयार झाला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन देखील त्यांनी केले.

    Agreement between Pawar and Modi in wearing hats to farmers; Raju Shetty’s harsh criticism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस