• Download App
    धनगर समाजातील आंदोलक आक्रमक; सुप्रिया सुळेंना म्हणाले, खासदारकीचा राजीनामा द्या; आंदोलनस्थळी हायव्होल्टेज ड्रामा Agitators in Dhangar community aggressive; Supriya said to Sulena, resign from MP

    धनगर समाजातील आंदोलक आक्रमक; सुप्रिया सुळेंना म्हणाले, खासदारकीचा राजीनामा द्या; आंदोलनस्थळी हायव्होल्टेज ड्रामा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातही फोन केला. Agitators in Dhangar community aggressive; Supriya said to Sulena, resign from MP

    पण त्यानंतरही आंदोलक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. याउलट आंदोलकांनी थेट सुप्रिया सुळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही आंदोलकांनी तर सुप्रिया सुळे भाजपचे काम करतात, असा गंभीर आरोपही केला. यावेळी आंदोलकामध्ये बाचाबाची झाली.

    आरक्षणासाठी बारामतीत धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. धनगर समाजाचे नेते चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला बसले आहेत. वाघमोडे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या नेत्यांना इशारा दिला होता. शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्या गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना अडवणार, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला होता.


    गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना आंदोलकांनी अडवू नये म्हणून धनगर आरक्षण आंदोलनात सुप्रिया सुळेंचे लक्ष!!


    त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फोन लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर हा प्रश्न घाला. तसेच तुम्ही कोणीतरी प्रशासकीय अधिकारी इथे पाठवा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली.

    यावेळी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोन केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी श्रीकांत शिंदे यांना आपल्या वडिलांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडा, असे आवाहन केले. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी आपण धनगर आरक्षणाच्या आंदोलनाची माहिती देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण काही तरुण आंदोलक यांनी आक्रमक भूमिका मांडली.

    आंदोलक तरुणाची राजीनाम्याची मागणी

    तुमच्या खासदारांना माहिती आहे का, काय करायला पाहिजे?” असा सवाल एका धनगर तरुणाने केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, “आम्ही प्रपोजल आला की त्याला पाठिंबा देऊ. सरकारला म्हणावं, एक दिवस सेशन घ्या.” त्यानंतर एका आंदोलकाने सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी मागणी केली. “तुम्ही राजीनामा द्या आणि आंदोलनाची तीव्रता वाढवा, अशी मागणी एका आंदोलकाने केली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. पण राजीनामा देऊन प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. या बारामतीत 60 हजार धनगर मतदार आहेत. आम्ही कधीच विरोध केला नाही. चौंडीला तुम्ही गेले पण इथे 5 दिवसांनी आले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    आंदोलकांमध्ये बाचाबाची

    धनगर समाजाविषयी भूमिका जाहीर करा, अन्यथा बारामतीत आम्ही आमचा उमेदवार देणार. आतापर्यंत आमची फसवणूक झाली. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. तेव्हा शरद पवारांनी कधीच केंद्राला प्रस्ताव पाठवला नाही, अशी भूमिका आक्रमक आंदोलकांनी मांडली. यावेळी धनगर समाजाच्या आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. सुप्रिया सुळे भाजपचं काम करतात, असा आरोप काही आंदोलकांनी केला. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. गोविंद बागेत उद्या शरद पवारांच्या भेटीसाठी येणाऱ्या नेतेमंडळींना अडवणार नाही, असा शब्द आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना दिला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या चर्चेला यश आल्याची चर्चा सुरू आहे.

    Agitators in Dhangar community aggressive; Supriya said to Sulena, resign from MP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस