• Download App
    अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीकडून आंदोलन; बॅनरवर शहा, मोदीच का? ; शिवराय, आंबेडकर यांचे फोटो नसल्याचा संताप|Agitation by NCP during Amit Shah's visit; Why Shah, Modi on the banner? ; Anger over lack of photos of Shivrai and Ambedkar

    अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीकडून आंदोलन; बॅनरवर शहा, मोदीच का? ; शिवराय, आंबेडकर यांचे फोटो नसल्याचा संताप

    वृत्तसंस्था

    पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त लावलेल्या स्वागत बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला नाही. त्या ऐवजी अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक किरकोळ नेत्यांचे फोटो लावले आहेत, असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले.Agitation by NCP during Amit Shah’s visit; Why Shah, Modi on the banner? ; Anger over lack of photos of Shivrai and Ambedkar

    ‘चले जाओ, चले जाओ अमित शाह चले जाओ’,महापुरुषांच्या अवमानाचा निषेध, असा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी दिल्या.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्यात विटंबना करण्यात आली.



    भाजप नेते अमित शहा यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे पालिकेत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला.

    चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक किरकोळ नेत्यांचे फोटो लावले. जिथे संधी मिळेल तिथे महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भाजपचे हे धोरण आहे,

    याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने आज जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले.

    यावेळी कर्नाटकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून वंदन करण्यात आले.

    Agitation by NCP during Amit Shah’s visit; Why Shah, Modi on the banner? ; Anger over lack of photos of Shivrai and Ambedkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस