• Download App
    महाराष्ट्रात पोलीस भरतीची वयोमर्यादा शिथिल, कोरोना काळातील सर्व उमेदवारांना संधी; 14956 जागांचा वाचा तपशील Age limit for police recruitment relaxed in Maharashtra

    महाराष्ट्रात पोलीस भरतीची वयोमर्यादा शिथिल, कोरोना काळातील सर्व उमेदवारांना संधी; 14956 जागांचा वाचा तपशील

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकारने काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर केली पण त्यानंतर वयोमर्यादेचा तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरती पुढे ढकलली. मात्र आता हा तांत्रिक मुद्दा दूर करून सरकारने पोलीस भरतीचा मार्ग मोकळा केला आहे. Age limit for police recruitment relaxed in Maharashtra

    कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध होणार आहे.

    ज्या उमेदवारांची कोरोना काळात फॉर्म भरले पण ज्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. अंतर आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तसंच यामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

     जागा भरतीचे तपशील

    मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244, लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण – 14956

    कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

    अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) – 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926 इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा, एकूण – 1495

    Age limit for police recruitment relaxed in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!