• Download App
    Pune Car Accident : ड्रायव्हरला धमकावले, घरात डांबून ठेवले; अग्रवाल परिवाराचा "कारनामा" पोलीस आयुक्तांनी सांगितला!! Agarwal family's deed told by police commissioner

    Pune Car Accident : ड्रायव्हरला धमकावले, घरात डांबून ठेवले; अग्रवाल परिवाराचा “कारनामा” पोलीस आयुक्तांनी सांगितला!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पोर्शे कार भरधाव वेगात चालवून दोन इंजिनियर्सचे बळी घेणाऱ्या आपल्या व्यसनी – दारुड्या मुलाला वाचवण्यासाठी अग्रवाल कुटुंबाने नेमके काय “कारनामे” केले याची तपशीलवार माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. Agarwal family’s deed told by police commissioner

    पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी पुण्यातील धनाढ्य अग्रवाल कुटुंबाने शक्य त्या सर्व गैरमार्गांचा अवलंब केला. ड्रायव्हरला घरात कोंडून ठेवले. त्याच्याकडून खोटा जबाब घेतला. यात वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल हे दोघेही सामील होते. या दोघांनी ड्रायव्हर गंगाराम पुजारी याच्यावर प्रचंड दबाव आणून त्याच्याकडून खोटा जबाब घेतला, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

    अमितेश कुमार म्हणाले :

    ड्रायव्हर गंगाराम पुजारी आपल्या घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याला आपल्या गाडीत बसवून घरी नेले. त्यानंतर दोघांनी गंगाराम पुजारीचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला घरातील एका खोलीत डांबून ठेवले. तू कुठेही जायचे नाही, कोणाशीही बोलायचे नाही. आम्ही सांगू तोच जबाब पोलिसांना द्यायचा, असा दबाव अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकावर आणला. तू हा गुन्हा तुझ्या अंगावर घे आम्ही तुला “गिफ्ट” देऊ, असे सांगून अग्रवाल यांनी गंगाराम पुजारीला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता तेव्हा अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकाला धमकावले. आम्ही तुला बघून घेऊ, अशी धमकी दिली.

    विशाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी गंगारामला आपल्या घरात डांबून ठेवले होते. त्याचा मोबाईल फोन काढून घेतल्यामुळे घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता. आपला नवरा घरी आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गंगाराम पुजारीची बायको नातेवाईकांना घेऊन अग्रवाल कुटुंबीयांच्या घरी पोहोचली. अग्रवाल कुटुंबीयांनी गंगारामला सोडण्यास नकार दिला तेव्हा त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाने गंगारामला सोडले. अग्रवाल यांच्या घरातून पत्नीसह बाहेर पडल्यानंतर गंगाराम घाबरला होता.

    पण पोलिसांनी परवा त्याचा जबाब नोंदवून घेतला. काल  त्याची प्राथमिक चौकशी करुन आम्ही सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर कलम 342, कलम 365 आणि कलम 368 अंतर्गत अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवण्याचा गु्न्हा दाखल केला. यानंतर सुरेंद्र अग्रवालला अटक केली असून त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाईल. विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याला आवश्यक ती प्रक्रिया करुन पुन्हा ताब्यात घेतले जाईल.

    पुणे अपघात प्रकरणाचा तपास शुक्रवारी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रायव्हरसह अग्रवाल यांच्या घरी जाऊन पंचनामा केला. ड्रायव्हरला ज्या खोलीत डांबण्यात आले होते, त्यावेळी ड्रायव्हरने जे कपडे घातले होते, ते ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

    अपघात झाला त्यावेळी पोर्शे कार माझा मुलगा नव्हे, तर ड्रायव्हर चालवत होता, असा दावा विशाल अग्रवाल यांनी न्यायालयात केला होता. मात्र, अपघाताच्या वेळी गाडी विशाल अग्रवाल यांचा मुलगाच चालवत होता, अशी कबुली ड्रायव्हरने दिली. माझी या सगळ्या कोणतीही चूक नाही. अग्रवाल यांनी आमिष दाखवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला दबावात घाबरुन जाऊन जबाब दिला. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली. मी घाबरलो होतो, असे ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले. अग्रवाल कुटुंबीयांनी आपल्याला जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवले, याचा ड्रायव्हर गंगाराम पुजारीला मोठा मानसिक धक्का बसला.

    Agarwal family’s deed told by police commissioner

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; कृत्रिम वाळू एम-सँड धोरणास मंजुरी, प्रतिब्रास 200 रुपये सवलत

    Devendra Fadnavis : 2047 पर्यंत देशातील अणुऊर्जा उत्पादन 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर

    फडणवीस केंद्राची 50 टक्के भागीदारी मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर मेट्रो विस्तार शक्य