विशेष प्रतिनिधी
पुणे : वाईन नंतर काही महिन्यातच सुपर मार्केटमध्ये दारू विकतील, गांजा विकतील, पुन्हा गुटखा विकायला परवानगी देतील. वेळीच या सरकारची नशा उतरवा, हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.After wine, supermarkets will sell liquor, marijuana, gutkha, says Trupti Desai
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात लवकरच किराणा दुकानं आणि सुपर मार्केट्समध्ये वाईन मिळणार आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला सर्वसामान्यांनी विरोध केला पाहिजे अन्यथा अनेक दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो तरुण व्यसनाकडे वळतील,
अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होतील, अजून गुन्ह्यांमध्ये वाढ होईल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नसून ज्यांनी वाईन फॅक्टरीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्या बड्या उद्योजकांच्या आणि बड्या राजकारण्यांच्या फायद्यासाठी घेतलेला आहे असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.
राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घ्यायचा असेल तर मग उत्पादनावर आधारित भाव द्या अशी मागणी करून देसाई म्हणाल्या, वाईनमध्ये अल्कोहोल असते, वाईन पिल्यावरसुद्धा गाडी चालवताना पोलीस कारवाई करतातच याचे कारण त्याने नशा चढते.
त्यामुळे आता जर विरोध केला नाही तर, पुढे वाईन नंतर काही महिन्यातच सुपर मार्केटमध्ये दारू विकतील, गांजा विकतील, पुन्हा गुटखा विकायला परवानगी देतील. वेळीच या सरकारची नशा उतरवा, हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडूया.
After wine, supermarkets will sell liquor, marijuana, gutkha, says Trupti Desai
महत्त्वाच्या बातम्या
- Budget 2022 : राज्यसभेच्या सदस्यांसाठी आचारसंहिता जाहीर, कामकाज सुरळीत चालण्यासाठी लागू होणार हे नियम, वाचा सविस्तर…
- पेगाससवरून विरोधकांनी पुन्हा केंद्राला घेरले : राहुल गांधींचा आरोप –मोदी सरकारने देशद्रोह केला!, सुब्रमण्यम स्वामी म्हणतात- मोदी सरकारने खंडन करावे!
- टेलिकॉम कंपन्यांना ट्रायच्या सूचना : प्रीपेड मोबाइल ग्राहकांना रिचार्जची वैधता २८ ऐवजी ३० दिवस द्यावी लागेल
- राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? मानहानीच्या खटल्याची ठाण्यातील न्यायालयात दररोज होणार सुनावणी