आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन शिखर’ कार्यक्रमाची सुरुवात
विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम खेड्यातील किमान १७ आदिवासी विद्यार्थ्यांनी जेईई मेन उत्तीर्ण करून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये शिक्षण घेण्याच्या आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. After training under the government programme 17 tribal students have come a step closer to their IIT dream
एका अधिकाऱ्याने याबाबत मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील बोरगाव बाजार येथे आदिवासी विकास विभागाच्या चार महिन्यांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन हे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरले आहेत.
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल (ईएमआरएस) मध्ये शिकत असलेल्या गडचिरोली आणि गोंदियातील सुमारे १७ आदिवासी विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने गठित केलेल्या पथकाने या वर्षी जेईईसाठी प्रशिक्षण दिले.
पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले की, त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व आश्रमशाळांना भेटी देऊन ‘मिशन शिखर’ कार्यक्रम सुरू केला. ठाकरे यांनी आश्रमशाळांतील शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण आणि कार्यशाळा सुरू केल्या. ते म्हणाले की, आदिवासी विद्यार्थी अभ्यासात खूप चांगले आहेत, पण त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही आणि 2021 मध्ये सुरू झालेले ‘मिशन शिखर’ हे तेच व्यासपीठ आहे.
After training under the government programme 17 tribal students have come a step closer to their IIT dream
महत्वाच्या बातम्या
- मध्यप्रदेश : सातपुडा भवन इमारतीला भीषण आग, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी हवाई दलाची मागितली मदत
- प्रियांकांना राष्ट्रीय मैदानात उतरवण्याची तयारी याचा अर्थ काँग्रेसचा “राहुल प्रयोग” फसल्याची कबुली!!
- कायदा सुव्यवस्थेबाबत विरोधकांचा “नॅरेटिव्ह गदारोळ”, पण महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात मात्र शिंदे – फडणवीसांनाच पूर्ण बहुमत!!
- अभिनेत्री राधिका देशपांडेची “द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक” या कार्यक्रमात हजेरी अनेक प्रश्नांना दिली