एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्यात. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परीक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारताय. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वागतंय, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.after the suicide of Swapnil Lonakar, the incumbent government is behaving shamelessly
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्यात. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परीक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारताय. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वागतंय, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
राज्यात आरोग्य विभागातील परीक्षांमध्ये पून्हा हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवारांना पुन्हा एकदा त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकाच तारखेला दोन परीक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ठेवलेल्या आहेत. जे केंद्र उमेदवारांनी निवडली आहेत, ते केंद्र न देता दुसरे लांबचे केंद्र कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. परीक्षेत दोनदा गोंधळ झाल्याने संतापाची भावना देखील निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी देखील या मुद्द्य्यावरून राज्य सरकावर निशाणा साधला आहे.
पडळकर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने कोणतीही, कसलीही पूर्वसूचना न देता परीक्षा रद्द केली. करोनाच्या काळात विद्यार्थी कसेबसे परीक्षा केंद्रावर पोहचले होते. त्यांना तिथून त्यांनी माघारी पाठवलं. सरकारी भरतीच्या परीक्षेत सावळा गोंधळ घालायची सवयच या सरकारला लागलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यांनी सहावेळा पुढे ढकलली. विद्यार्थी या सगळ्या परिस्थितीत मानसिक तणावाखाली आलेले आहेत. परंतु, याचं कसलंही, कोणतही गांभीर्य सरकारला अजिबात नाही. प्रशासन व सरकारमध्ये कसलाही ताळमेळ राहिलेला नाही.
after the suicide of Swapnil Lonakar, the incumbent government is behaving shamelessly
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!
- चंद्रकांत पाटलांची मोठी ऑफर ; म्हणाले – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा
- जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड
- नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!