• Download App
    अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांची धावाधाव; आमदारांना फोनाफोनी करून पक्षात टिकवण्यासाठी अटकाव!! After the resignation of Ashok Chavan, Congress leaders are running

    अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांची धावाधाव; आमदारांना फोनाफोनी करून पक्षात टिकवण्यासाठी अटकाव!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांची धावाधाव झाली आहे. प्रत्येक आमदाराला फोन करून पक्ष टिकवण्यासाठी अटकाव घालण्याचे प्रयत्न जोरावर आले आहेत. After the resignation of Ashok Chavan, Congress leaders are running

    एकटे अशोक चव्हाण काँग्रेस मधून बाहेर पडणार नाहीत त्यांच्या समवेत अनेक आमदार बाहेर पडतील अशी “राजकीय व्यवस्था” आधीच केली असताना काँग्रेसचे नेते आता खडबडून जागे झाले आहेत. नाना पटोले यांनी मुंबई सोडून छत्तीसगड गाठले आहे. तेथे राहुल गांधींना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी एकमेकांशी संपर्क साधून अशोक चव्हाणांच्या राजीनामे विषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत,

    पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी अशोक चव्हाण गेले त्यांच्या पाठोपाठ बाकीचे आमदार जाऊ नये म्हणून फोनाफोनी करून त्यांना पक्षातच खेचून धरण्याचा अटकाव करण्याचा प्रयत्न चालवला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनामा बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत करताना नकळतपणे ही माहिती देऊन टाकली.

    पक्षातल्या सगळ्या आमदारांना आम्ही संपर्क केला असून अशोक चव्हाणांच्या समवेत कोणीही पक्ष सोडणार नाही, असे आश्वासन या सर्व आमदारांनी पक्ष नेतृत्वाला दिले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण पक्षाचे वरिष्ठ नेते होते. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होते. पक्षाने त्यांना दोनदा मुख्यमंत्री आणि एकदा प्रदेशाध्यक्ष केले. त्यांना अनेक पदे दिली पण त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी पक्ष सोडण्याचा तडकाफडकी निर्णय का घेतला??, हे आम्हाला माहिती नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यातून काँग्रेसमध्ये उडालेले धावपळ जनतेसमोर आली.

    अशोक चव्हाण हे प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नईतला यांच्या समावेत काल झालेल्या बैठकीला उपस्थित होते. आज सकाळीच पुन्हा एकदा आम्ही एकत्र जमून पक्षाची राज्यसभा निवडणुकीतली रणनीती ठरवणार होतो.पण तेवढ्यात अशोक चव्हाण यांचा राजीनामा आला. त्याविषयी कुणालाच काहीही माहिती नव्हती, अशी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या कबुलीतूनच काँग्रेसमध्ये पक्ष संघटनात्मक पातळीवर किती आणि कसा गोंधळ आहे, हेच समोर आले.

    After the resignation of Ashok Chavan, Congress leaders are running

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस