शिवसेनेच्यावतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘’ नवी मुंबई शहर आणि शिवसेनेचे अनोखे नाते असून गेली अनेक वर्षे हे नाते अबाधित आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले. तसेच शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, व्यापारी अशा सर्व घटकांना न्याय देऊ शकतील असे निर्णय घेतले.’’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई शिवसेनेच्यावतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात काल भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. After the formation of the Mahayuti government in the state many decisions were taken for public interest Chief Minister Shinde
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘’नवी मुंबईत प्रस्तावित असलेल्या क्लस्टर योजनेचा प्रस्ताव माझ्याकडे आला असून त्यावर नक्कीच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे यावेळी सांगितले. तसेच नवी मुंबईतील इतर सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच एकत्रित बैठक घेऊन या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल.’’ असे आश्वस्त केले.
याचबरोबर ‘’शासन आपल्या दारी या उपक्रमाद्वारे घराघरात सरकारी योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले आहेत, आज हा उपक्रम म्हणजे एक चळवळ बनली असून लोकांना त्याचा लाभ मिळत आहे. राज्यातील मुख्यमंत्री हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असून तुम्हीही एकनाथ शिंदे बनून शासनाचे निर्णय आणि उपक्रम सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जावे.’’ असे आवाहन यावेळी केले.
After the formation of the Mahayuti government in the state many decisions were taken for public interest Chief Minister Shinde
महत्वाच्या बातम्या
- शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या संघर्षात काँग्रेसला लाभ; भाजप खालोखाल दुसऱ्या नंबरचा पक्ष!!
- ‘’बिहारसाठी काहीतरी चांगले करा, दुसऱ्यांना दोष देत राहिल्यास …’’ प्रशांत किशोर यांचा तेजस्वी यादवांवर निशाणा!
- नाशिक मध्ये मुलींसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन
- आता लॉटरी पद्धत नाही, तर मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे आणि ड्रीप सिस्टीम; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय