Friday, 9 May 2025
  • Download App
    शिवसेनेच्या संजय पवारांच्या पराभवानंतर संभाजीराजेंना आठवला तुकोबांचा वाघाचा अभंग!!After the defeat of Shiv Sena's Sanjay Pawar, Sambhaji Raje remembered Tukob's tiger abhang

    राज्यसभा निवडणूक : शिवसेनेच्या संजय पवारांच्या पराभवानंतर संभाजीराजेंना आठवला तुकोबांचा वाघाचा अभंग!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वाघाचा अभंग आठवला आहे. वाघाचे कातडे पांघरल्यावर वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही. असा तुकोबांच्या अभंगाचा दाखला त्यांनी दिला आहे. After the defeat of Shiv Sena’s Sanjay Pawar, Sambhaji Raje remembered Tukob’s tiger abhang

    असे आहे संभाजीराजेंचे ट्वीट

    छत्रपती संभाजी राजे यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, संभाजीराजेंनी हे ट्वीट केले आहे. वाघासारखे पांघरुण घेतल्यावर आपण वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणा-यांची लगेचच फजिती होते, अशा आशयाचे ते ट्विट आहे.

    – शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंबा दिला नाही

    संभाजीराजे यांच्या राष्ट्रपती नियुक्ती खासदारकीचा 3 मे रोजी कार्यकाळ संपला. त्यानंतर त्यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. महाविकास आघाडीत सहावी जागा शिवसेनेला मिळाल्यामुळे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याची विनंती केली होती. परंतु, संभीजीराजे यांनी शिवसेनेची ही ऑफर स्वीकारली नाही. त्यामुळे सहाव्या जागेवरुन चांगलेच राजकारण सुरु झाले होते. शेवटी शिवसेनेने कोल्हापूर शहर प्रमुख संजय पवार यांना जागेसाठी उमेदवारी दिली.

    त्यामुळे स्वाभिमान राखण्यासाठी संभजीराजे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु आता शिवसेनेचा उमेदवार संजय पवार हे पराभूत झाल्यानंतर, त्यांनी ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला.

    After the defeat of Shiv Sena’s Sanjay Pawar, Sambhaji Raje remembered Tukob’s tiger abhang

    Related posts

    Finance Commission : वित्त आयोगाकडून महाराष्ट्राच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Icon News Hub