• Download App
    14 महिन्यांत 14 तारखा, आता पंधरावी तारीख; मुख्यमंत्री बदलाची वडेट्टीवारांची सप्टेंबरची तारीख!!|After Sanjay raut now Vijay wadettivar claims the chief ministerial change in maharashtra

    14 महिन्यांत 14 तारखा, आता पंधरावी तारीख; मुख्यमंत्री बदलाची वडेट्टीवारांची सप्टेंबरची तारीख!!

    प्रतिनिधी

    मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दर महिन्याला एक अशा 14 तारखा विरोधकांनी मुख्यमंत्री बदलासाठी देऊन झाल्या. आता पंधरावी तारीख विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.After Sanjay raut now Vijay wadettivar claims the chief ministerial change in maharashtra

    यापूर्वी ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे नियमितपणे मुख्यमंत्री बदलाच्या आणि सरकार पडण्याच्या तारखांवर तारखा देत होते. पण प्रत्यक्षात त्यापैकी कुठल्याही तारखेला मुख्यमंत्री बदलले नाहीत किंवा सरकारही पडले नाही. उलट दिल्लीतून मोदी – शाहांच्या पाठिंब्याने आणि खाली फडणवीसांच्या साथीने त्यांचे आसन मजबूत झाले. सरकारला आता अजित पवारांची राजकीय स्टेपनी जोडली.



    पण तरीही विरोधकांचे तारीख पे तारीख थांबायला तयार नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल मातोश्री मध्ये उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आल्यानंतर मुख्यमंत्री बदलाची पुढची तारीख सप्टेंबर 2024 ची दिली आहे. येत्या 15 – 20 दिवसांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी होतील. याचा अर्थ आम्ही सत्तेवर येऊ असा नाही, पण मुख्यमंत्रीपदावर निश्चित नवीन वेगळीच व्यक्ती येईल, असे भाकीत विजय वडेट्टीवार यांनी वर्कविले आहे. त्यासाठी त्यांनी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा अहवाला दिला आहे. शासकीय कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित असले, तर एक उपमुख्यमंत्री गायब असतो आणि दोन उपमुख्यमंत्री उपस्थित असतील, तर एक मुख्यमंत्री गायब असतो. सर्व आमदारांच्या चहापानाच्या आणि स्नेहभोजनाच्या वेळी देखील असेच चित्र दिसते. त्यामुळे सध्याच्या सरकारमध्ये सगळे काही अलबेल नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

    आत्तापर्यंत संजय राऊत हे मुख्यमंत्री बदलाच्या आणि सरकार पाडण्याच्या तारखा देत होते. पण गेल्या 14 महिन्यांत तसे काही घडू शकले नाही. किंबहुना विरोधकांना तसे काही घडवता आले नाही. आता तारखा देण्याचा “बॅटन” संजय राऊत यांच्याकडून विजय वडेट्टीवार यांनी हाती घेतला आहे. त्यांनी सांगितलेल्या तारखेनुसार मुख्यमंत्री बदल होतो का??, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

    After Sanjay raut now Vijay wadettivar claims the chief ministerial change in maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा