• Download App
    रुपाली ठोंबरे पाटील यांच्यानंतर अभिजित पानसे देखील मनसेला करणार रामरामAfter Rupali Thombre Patil, Abhijit Panse will also say goodbye to MNS

    रुपाली ठोंबरे पाटील यांच्यानंतर अभिजित पानसे देखील मनसेला करणार रामराम

    अभिजीत पानसे यांचा एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याचे दिसत आहे.After Rupali Thombre Patil, Abhijit Panse will also say goodbye to MNS


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आज सकाळी पुण्यातील मनसेच्या वरिष्ठ नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधले. त्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे देखील मनसेला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.



    ते काही वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांचा एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. याप्रसंगी युवासेना सचिव वरूण सरदेसाई देखील उपस्थित होते. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहीती मिळतेय.

    अभिजीत पानसे ही रुपाली पाटील ठोंबरे यांच्या पाठोपाठ मनसेला रामराम करणार का..? हा सवाल सोशल मीडियातून उपस्थित केला जात आहे. आगामी काळात पानसे काय निर्णय घेतात याकडे त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

    After Rupali Thombre Patil, Abhijit Panse will also say goodbye to MNS

    Related posts

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Laxman Hake : महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा

    मनोज जरांगेंच्या आंदोलनात पवार + ठाकरेंचे नेते घुसले; पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाबाबत पवार + ठाकरेंची भूमिका संशयाच्या घेण्यात!!