• Download App
    भाजप मनसे युती की टॅक्टिकल अंडरस्टँडिंग?; शिवतीर्थावर राज ठाकरे - नारायण राणे भेटीनंतर चर्चेला उधाण After Raj Thackeray - Narayan Rane's meeting at Shivtirtha, a discussion arose

    भाजप मनसे युती की टॅक्टिकल अंडरस्टँडिंग?; शिवतीर्थावर राज ठाकरे – नारायण राणे भेटीनंतर चर्चेला उधाण

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या दादरमधील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी राणे यांनी सपत्नीक ही भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. After Raj Thackeray – Narayan Rane’s meeting at Shivtirtha, a discussion arose

    मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर या राणे आणि ठाकरे भेटीला विशेष महत्त्व आहे. या भेटीत राज ठाकरे आणि नारायण राणे हे शिवतीर्थाच्या गॅलरीत पाहायला मिळाले. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट वैयक्तिक आहे. यात कौटुंबिक मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.



    पण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईसह 16 महापालिकांच्या महत्त्वाच्या निवडणुका जाहीर होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मनसेशी उघड युती करणार की छुपी युती करून शिवसेना उबाठासह काँग्रेस – राष्ट्रवादीलाही वेगळ्या पद्धतीचे धक्के देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरे यांनी सरत्या वर्षात भाजपच्या नेत्यांच्या अनेक भेटीगाठी घेतल्या आहेत. यामध्ये उघडपणे दोन्ही बाजूंनी काहीही सांगितले नाही. पण भाजप आणि मनसे यांच्यात काही महत्त्वपूर्ण टॅक्टिकल अंडरस्टँडिंग आधीच झाले असल्याचीच चर्चा खरी मानण्यासारखी परिस्थिती आहे. आजची नारायण राणे आणि राज ठाकरे यांची भेट हेच नेमके सूचित करत आहे.

    After Raj Thackeray – Narayan Rane’s meeting at Shivtirtha, a discussion arose

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

    स्वतः अध्यक्ष राहिलेल्या आणि नातवाला अध्यक्ष केलेल्या पवारांना आता क्रिकेटमध्ये राजकीय व्यक्ती नको!!

    Maharashtra Govt : संस्थांनी दिलेला निधी वापरा, नाही तर परत द्या; राज्य शासनाचा 28 फेब्रुवारपर्यंत अल्टिमेटम