विशेष प्रतिनिधी
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, माढा मधल्या प्रचंड तुफानी सभांनंतर भाजप आणि महायुतीने विश्रांती घेतली नसून पंतप्रधानांच्या या पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्र दौऱ्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री फायर ब्रँड बुलडोजर बाबा योगी आदित्यनाथ यांनी दक्षिण महाराष्ट्राचा तुफानी दौरा केला. After PM Modi, its Yogi, his firestorm speechs enthralled southern maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठोपाठ संपूर्ण देशभर योगी आदित्यनाथ यांची क्रेझ आहे. त्याचा पुरेपूर वापर भाजपने आज दक्षिण महाराष्ट्रात करून घेतला.
दक्षिण महाराष्ट्राच्या या दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी सोलापूर, कोल्हापूर आणि हातकणंगले या तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जोरदार सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याच्या सभेत थेट शरद पवारांवर हल्लाबोल करताना त्यांना “भटकती आत्मा” असे संबोधले होते. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तुंबळ शब्द युद्ध रंगले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतले.
या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे फायर ब्रँड मुख्यमंत्री बुलडोजर बाबा योगी आदित्यनाथ यांनी सोलापूर, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांमध्ये तुफानी सभा घेतल्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर निर्माण झालेले वातावरण अधिकच चार्ज्ड झाले. या तिन्ही सभांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तुफानी हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे असे नॅरेटिव्ह सेट केले. त्या नॅरेटिव्हला योगी आदित्यनाथ यांनी पुष्टी दिली. योगी आदित्यनाथ यांच्या सभांमुळे दक्षिण महाराष्ट्रातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पसरला.
After PM Modi, its Yogi, his firestorm speechs enthralled southern maharashtra
महत्वाच्या बातम्या
- IMF कडून पाकला 9 हजार कोटी रुपयांची मदत; भारताने तिसऱ्या हफ्त्याच्या बाजूने मतदान केले नाही
- ठाकरे आणि पवार त्यांच्या मुलांसाठीच फिरत असल्याची कबुली देत ठाकरेंची मोदींवर वखवखलेल्या आत्म्याची टीका!!
- मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका, सहावेळा आमदार झालेले रामनिवास रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- “… पण असे असूनही दक्षिणेत भाजपच्या जागा वाढतील” ; राजीव चंद्रशेखर यांचे विधान!