प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या फक्त 2 वज्रमूठ सभा पार पडल्या आहेत. अजून 9 सभा व्हायच्या बाकी आहेत, तरी देखील या वज्रमुठीतली सगळी बोटे सैल झाली आहेत. सावरकर मुद्द्यावर काँग्रेसशी पंगा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंची आता अदानी मुद्द्यावर राष्ट्रवादीशी टक्कर घेण्याची तयारी दिसते आहे.After Pawar – adani meeting Uddhav Thackeray will hold separate press conference on the issue
कारण आज सकाळी गौतम अदानी आणि शरद पवार यांची सिल्वर ओकवर बैठक झाली. त्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारल्यानंतर आपण अदानी मुद्द्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बोलू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे आज अचानक मातोश्रीतून बाहेर पडून बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी करायला गेले होते. तेथे पत्रकारांनी त्यांना शरद पवार – गौतम अदानी भेटीबद्दल विचारल्यानंतर आपण अदानी मुद्द्यावर आणि देशातल्या एकूणच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बोलू, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी सावरकर मुद्द्यावर जसा काँग्रेसची थेट पंगा घेतला तशी अदानी मुद्द्यावर राष्ट्रवादीशी टक्कर घेण्याची तयारी चालविल्याचे यातून दिसून येते.
अजित पवारांच्या बंडाच्या बातम्या महाराष्ट्रात सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी एक सूचक विधान केले होते, ते म्हणजे कदाचित भाजपशी मला एकट्याला लढावे लागेल, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सह भाजपमध्ये विलीन होतील किंवा शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा देतील, असे मानले जात होते. एकूणच सावरकर काय किंवा अदानी काय या दोन मुद्द्यांवर महाविकास आघाडी मच्या तीन पक्षांची वज्रमूठ ढिल्ली झाली आहे आणि त्याची बोटे सैलावून ती वज्रमूठ उघडी पडायच्या बेतात आली आहे!!
After Pawar – adani meeting Uddhav Thackeray will hold separate press conference on the issue
महत्वाच्या बातम्या
- येमेनमध्ये चॅरिटी इव्हेंटमध्ये चेंगराचेंगरी, 85 ठार, हुथी सैन्याने गर्दीवर नियंत्रणासाठी केला गोळीबार
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!