• Download App
    पराग मणेरेंपाठोपाठ सुजाता पाटील पोलीस सेवेत पुन्हा रुजू!! After Parag Maner, Sujata Patil rejoins police service

    पराग मणेरेंपाठोपाठ सुजाता पाटील पोलीस सेवेत पुन्हा रुजू!!

    प्रतिनिधी

    मुंबई : अनिल देशमुखांच्या 100 कोटींच्या खंडणी प्रकरणी आरोप झालेले अपर पोलीस अधीक्षक पराग मणेरे यांच्यावर ठाकरे – पवार सरकारने निलंबनाची कारवाई केली होती, ही कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेत मणेरे यांना पुन्हा शासन सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सरकारने आणखी एका पोलीस अधिकारी सुजाता पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत रुजू केले आहे. After Parag Maner, Sujata Patil rejoins police service

    भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली केलेले निलंबन  

    महिला पोलीस अधिकारी सुजाता पाटील यांना ठाकरे – पवार सरकारच्या काळात लाच घेतल्याप्रकरणी निलंबित केले होते. अप्पर मुख्य सचिव गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर सेवेत पुन्हा सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्याचा चार्ज होता. सुजाता पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आल्या होत्या.

    सुजाता पाटील यांनी हिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहून आत्महत्या आणि राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता सुजाता पाटील यांना पोलीस सेवेत पुन्हा रुजू करून घेतले आहे.

    After Parag Maner, Sujata Patil rejoins police service

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!