• Download App
    नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भाजपाचा ठाकरे गट अन् संजय राऊतांना टोला! After Neelam Gorhe joined the Shinde group BJP criticized the Thackeray group and Sanjay Raut

    नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भाजपाचा ठाकरे गट अन् संजय राऊतांना टोला!

    चित्रा वाघ, आशिष शेलारांनी ट्वीटद्वारे साधला निशाणा,  जाणून घ्या काय म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवसेना भवनात शिवसेनेत(शिंदे गट) प्रवेश केला. यानंतर भाजपा नेत्यांकडून ठाकरे गटास टोला लगावला जात आहे. शिवाय, संजय राऊतांवरही निशाणा साधला गेला आहे. After Neelam Gorhe joined the Shinde group BJP criticized the Thackeray group and Sanjay Raut

    भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नीलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या पार्श्वभीवर ट्वीट करत म्हटले की,  ‘उठा’ठेवी करणाऱ्यांचा आणखी एक गडी आऊट..! दिवसेंदिवस पक्षाला गळती लागत असतानाही, शिंदे गटाचे १७-१८ आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या फुशारक्या मारणाऱ्या सर्वज्ञानींच्या कॉन्फिडन्सला दादच द्यायला हवी.. कसं काय जमतं बुवा स्वतःलाच खोटा दिलासा देणं..?’’

    याशिवाय, ‘’मुख्यमंत्री राजीनामा देणार!, सरकार पडणार!!, उबाठा मध्ये काही आमदार परत येणार!!! ,अजित दादांसोबतच्यांची आमदारकी धोक्यात!!! मीडियात अशा अफवा लाखात पसरवणारे एकच ते महान “विश्वविख्यात” हाच स्वभाव नडला आणि कारण नसताना आमचा बाप काढला आता भोगा आपल्या कर्माची फळं!’’ अशा शब्दांमध्ये भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गट आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

    महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारा, स्वच्छ चेहरा, म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नीलम गोऱ्हे या सातत्याने ठाकरे गटाची बाजू मांडत होत्या. मात्र, आता नीलम गोऱ्हे यांनीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.

    After Neelam Gorhe joined the Shinde group BJP criticized the Thackeray group and Sanjay Raut

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस