आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यतेचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे पिंपरी चिंचवड शहरात प्रायोगिक तत्त्वावर ई-ट्रांझिट सुरू करण्यासंदर्भात HESS-AG कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. शहरी वाहतुकीसाठी ई-ट्रांझिट हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो त्यामुळे या प्रकल्पाच्या आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यतेचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, HESS-AG कंपनीने ई-बसचे उत्पादन भारतातच करावे, जेणेकरून उत्पादन खर्चात बचत होईल आणि एक परवडणारी व दर्जेदार वाहतूक सुविधा उभारता येईल. हा मॉडेल यशस्वी झाल्यास राज्यातील इतर 10 शहरांमध्ये देखील हा उपक्रम राबवता येईल.
सध्या सुरू असलेल्या ई-बस, मेट्रो आणि ई-ट्रांझिट या सर्व प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास करून एक चांगला आणि व्यवहार्य प्रस्ताव कंपनीने द्यावा. मेट्रोसोबत आणखी एक पर्याय सध्या शहरांसाठी गरजेचा आहे. तो या ई-ट्रांझिट सुविधेतून उपलब्ध होत असेल तर त्याचे स्वागतच आहे. या बैठकीस अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि HESS-AG कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
After metro e-bus government considering e-transit for urban transport
महत्वाच्या बातम्या
- Tahawwur Rana : तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर भाजपचा काँग्रेसवर निशाणा, म्हटले…
- याला म्हणतात मोदींची “अंधभक्ती”; बिहारमध्ये काँग्रेसने इच्छुकांना लावले सोशल मीडियाच्या नादी!!
- Mumbai : मोठी बातमी! ११-१२ एप्रिल रोजी मुंबईला जाणाऱ्या तब्बल ३३४ रेल्वे रद्द
- Rajnath Singh : युक्रेन-रशिया संघर्षात ड्रोन ठरताय सर्वात जास्त हानिकारक शस्त्र – राजनाथ सिंह