प्रतिनिधी
मुंबई : श्रीमंतीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये असेलेले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे अचानक मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थ येथे भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया आधीच उंचावल्या होत्या. त्यानंतर लागलीच राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर पोहोचल्यामुळे त्या भूवया अधिकच ताणल्या गेल्या. मोठ मोठ्या तर्कवितर्कांसह चर्चेला उधाण आले. After meeting Adani, Raj Thackeray meets Fadnavis
धारावी पुनर्विकास प्रकल्पावर चर्चा
गौतम अदानी स्वत: राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत धारावी पुनर्विकासविषयी चर्चा झाली, अशी माहिती आहे.
विशेष म्हणजे या भेटीनंतर आणखी महत्त्वाची घडामोड घडली. गौतम अदानी यांच्या भेटीनंतर अवघ्या तासाभरात राज ठाकरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी घरातून बाहेर पडले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोन बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, या विषयी अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले.
गौतम अदानी यांच्या भेटी नंतर राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये फक्त धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाची चर्चा झाली की आणखी कोणती राजकीय खिचडी शिजली?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
After meeting Adani, Raj Thackeray meets Fadnavis
महत्वाच्या बातम्या