भारतीय लष्कराचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज नरवने हे येत्या ३० एप्रील रोजी निवृत्त होत आहे. त्यांच्या जागी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे आता नवे लष्करप्रमुख होणार आहेत. मनोज पांडे हे मुळचे महाराष्ट्रातील नागपुर येथील असून सलग दुस-यांदा लष्करप्रमुखपदाचा मान हा राज्याला मिळाला आहे. After Manoj Narwane Lt Gen Manoj pande will take charge of Indian Army chief
विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय लष्कराचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज नरवने हे येत्या ३० एप्रील रोजी निवृत्त होत आहे. त्यांच्या जागी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे आता नवे लष्करप्रमुख होणार आहेत. मनोज पांडे हे मुळचे महाराष्ट्रातील नागपुर येथील असून सलग दुस-यांदा लष्करप्रमुखपदाचा मान हा राज्याला मिळाला आहे.
सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवने या महिन्याच्या ३० तारखेला निवृत्त होणार आहेत. यानंतर मनोज पांडे हे त्यांच्याकडून प्रमुखपदाची जबाबदारी स्विकारणार आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे मुळचे नागपुरचे आहेत. त्यांनी नॅशनल डिफेन्स अॅकेडमी तसेच राष्ट्रीय लष्करी अकादमीतून लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. लेफ्टनंट जनरल पांडे हे डिसेंबर १९८२ मध्ये कोअर आॅफ इंजिनिअर्सची रेजिमेंट असलेल्या बॉम्बे सॅपर्समध्ये कमिशन अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या लष्करातील प्रदिर्घ काळात त्यांनी विविध जबाबदा-या सांभाळल्या आहेत. इंग्लडमधील कॅम्बर्ली येथील स्टाफ कॉलेजमधून त्यांनी लष्करी कोर्स पूर्ण केला आहे. भारतात परतल्यानंतर त्यांची नियुक्ती माउंटन ब्रिगेड आणि ईशान्येकडील लष्कराच्या एका कोअरच्या प्रमुखपदी करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल असतांना त्यांनी इथिओपिया व इरिट्रिया येथील संयुक्त राष्ट्रांच्या अभियानात मुख्य अभियंता म्हणून काम पाहिले आहे. आपल्या ३९ वर्षांच्या लष्करी कारकीर्दीत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) ११७ इंजिनिअर रेजिमेंटचे नेतृत्व केले आहे. पुढे त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पल्लनवाला सेक्टरमध्ये आॅपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनिअर रेजिमेंटचे नेतृत्व त्यांनी केले.
लेफ्टनंट जनरल पांडे यांनी महू येथील आर्मी वॉर कॉलेजमधून हायर कमांड कोर्सही पूर्ण केला आहे. २०२१ मध्ये लष्कराच्या ईस्टर्न कमांडची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणूनही काम पाहिले आहे.लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयात चीफ आॅफ स्टाफ हेडक्वार्टरचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तसेच आर्मी हेडक्वार्टर मधील डायरेक्टर जनरल डिसिप्लिन सेरेमनीअल अँड वेल्फेअर आणि मिलिटरी आॅपरेशन्स डायरेक्टोरेट मध्ये अतिरिक्त महासंचालकाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.
लष्करात सध्या वरिष्ठ पदावर असलेले लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती आणि लेफटनंट जनरल वाय. के जोशी हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाले. तर लष्कराच्या प्रशिक्षण कमांडचे प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल राज शुक्ला हे ३१ मार्च रोजी निवृत्त झाले. यामुळे सध्या मनोज पांडे हे सर्वाधिक वरिष्ठ असून नवे लष्करप्रमुख म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. मनोज पांडे यांनी लष्करात अनेक महत्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या आहेत. लष्कराचे दक्षिण मुख्यालय, अंदमान आणि निकोबार कमांड सेंटरचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या सोबतच लष्कराच्या इस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
After Manoj Narwane Lt Gen Manoj pande will take charge of Indian Army chief
महत्त्वाच्या बातम्या
- प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पोलिसांनी सक्रिय केली ‘सोशल मीडिया लॅब’
- राज ठाकरेंना मोदी सरकार पुरविणार विशेष सुरक्षा, पीएफआयकडून धमकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- हिंदू बांधवांनो दोन नाही चार मुले जन्माला घाला, दोन देशासाठी समर्पित करा, साध्वी ऋतुंभरा यांचे वादग्रस्त आवाहन
- कॉँग्रेसला धोबीपछाड देण्याच्या तयारीत शरद पवार, बरी ताकद असलेल्या कर्नाटकात कॉँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी आता राष्ट्रवादी मैदानात
- महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि असामाजिक घटकांशी संबंधांच्या आरोपीखाली अटक काळजी ही गोष्ट काळजी करण्यासारखी नाही का? जे. पी. नड्डा यांचा सवाल