विशेष प्रतिनिधी
मुरगूड : राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर केला आहे. यासंबंधी मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चाही केली होती. तसेच तातडीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपही फेटाळून लावले होते.
After kirit somaiya’s allegations of money laundering on hassan mushrif, Mushrif may file a defamation suit against kirit somaiya
हसन मुश्रीफ यांच्याकडे निर्दोष सुटण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीयेत आणि असतील तर ते पुरावे त्यांनी सादर करावेत,असेही वक्तव्य सोम्म्या यांनी केले होते. पण आता या सर्व आरोपांविरुद्ध हसन मुश्रीफ लवकरच अब्रु नुकसानीचा दावा करणार आहेत. त्यासंबंधीची याचिका ते लवकरच कोर्टामध्ये दाखल करणार आहेत.
शंभर कोटी इतक्या मोठ्या रकमेचा अब्रु नुकसानीचा दावा ते दाखल करणार आहेत. पैकी पंचवीस टक्के रक्कम आधी कोर्टामध्ये भरावी लागते. तर पंचवीस कोटी रक्कम भरण्यासाठी हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी निधी जमवण्यास सुरुवात देखील केली आहे. पहिल्याच दिवशी गडहिंग्लजमध्ये पाच लाख इतकी रक्कम जमा करण्यात आली होती. तर मुरगुडमध्येही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणखी रक्कम उभी करण्याची सुरूवात केली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
After kirit somaiya’s allegations of money laundering on hassan mushrif, Mushrif may file a defamation suit against kirit somaiya
महत्त्वाच्या बातम्या
- डोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली
- दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप